आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘दिल्लीच्या तख्तावर ब्रह्मचारी नेता बसेल’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर - ‘दिल्लीच्या तख्तावर ब्रह्मचारी नेता बसेल’ असे भाकीत कर्नाटकातील अप्पाची वाडी येथील हालसिद्धनाथाच्या यात्रेत मंगळवारी वर्तविण्यात आले. बुधवारी या यात्रेचा मुख्य सोहळा होता, त्यात हजारो भाविकांनी सहभाग घेतला.

दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथेही बुधवारी श्री विठ्ठलदेव बिरदेव यात्रा लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडली. रोहिणीचा पाऊस आणि मृगाची पेरणी चांगली होईल, असे भाकीत फरांडे बाबांनी केले. या यात्रेत आलेल्या भाविकांवर हजारो किलो भंडारा उधळल्याने संपूर्ण परिसर पिवळा धमक झाला होता.