आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोल्हापूर - अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर सध्याचे सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील हे मुख्यमंत्री होण्यासाठी 200 कोटी रुपये घेऊन फिरत होते, असा आरोप माजी आमदार नरसिंगराव पाटील यांनी केला आहे. पाटील यांनी याआधीही काँग्रेस कमिटीच्या बैठकीत हा गौप्यस्फोट केला होता.
सध्या कोल्हापूर जिल्ह्यात कॉँग्रेसअंतर्गत संघर्ष उफाळल्याचे दिसून येते. पालकमंत्री हर्षवर्धन पाटील हे कोल्हापुरात केवळ पर्यटनालाच येतात असा आरोप कॉँग्रेसचे सहयोगी सदस्य असलेले खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी केला होता. आता मंडलिक यांचेच व्याही व नॅशनल हेवी इंजिनिअरिंग, राज्य सहकारी बँक, राज्य साखर संघ या ठिकाणची सर्व पदे भूषवलेले माजी आमदार नरसिंगराव पाटील यांनीही हर्षवर्धन पाटील यांच्यावर तोफ डागली. ‘मुख्यमंत्री होण्यासाठी हर्षवर्धन पाटील 200 कोटी रुपये घेऊन तयार होते. याचे पुरावे आहेत. वाटल्यास माझ्यावर त्यांनी खटले दाखल केले तरी बेहत्तर’, असे आव्हानही नरसिंगराव यांनी दिले आहे.
वैद्यकीय तपासणी करावी लागेल : हर्षवर्धन पाटील
नरसिंगराव पाटील यांचे वय झाले असून त्यांच्या वैद्यकीय तपासण्याची गरज आहे. दौलत साखर कारखाना नरसिंगरावांनी मातीत घातला. नॅशनल हेवीपासून अनेक संस्थांमध्ये त्यांनी काय दिवे लावले हे माहिती आहे. त्यामुळे माझ्याबाबत बोलण्याचा त्यांना अधिकार नाही, अशी प्रतिक्रिया देत हर्षवर्धन पाटील यांनी सर्व आरोप फेटाळले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.