आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पानसरेंचे मारेकरी माहीत, पण सरकारने नावे दडवली, हसन मुश्रीफ यांचा आरोप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- कॉ. गोविंद पानसरे यांचे हल्लेखोर सापडले आहेत. मात्र, फडणवीस सरकार त्यांची नावे जाहीर करण्यास टाळाटाळ करत अाहे, असा खळबळजनक आरोप माजी मंत्री, आमदार हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी केला. पानसरे यांच्या स्मारकाच्या कामाचा प्रारंभ झाला, त्या वेळी त्यांनी हा आरोप केला.

मुश्रीफ म्हणाले,विशेष पोलिस पथकाच्या एका अधिकाऱ्याने आपल्याला ही माहिती दिली असून हे हल्लेखोर शासनाच्या ताब्यात आहेत. मात्र, त्यांची नावे जाहीर केली जात नाहीत. त्यासाठी आता आम्ही आमच्या मार्गाने पाठपुरावा करणार आहोत. या वेळी अनेकांनी आपल्या भाषणामध्ये अजूनही हल्लेखोर सापडत नसल्याबद्दल संताप व्यक्त केला. स्थायी समिती सभापती आदिल फरास यांच्या प्रयत्नातून पानसरेंच्या निवासस्थानाजवळ असलेल्या वि. स. खांडेकर प्रशालेच्या आवारात पानसरे यांचे स्मारक होत आहे. या वेळी कॉ. भालचंद्र कानगो, पानसरे यांच्या कन्या स्मिता पानसरे, स्नुषा मेघा पानसरे अादी उपस्थित होते.

आरोप चुकीचा : शिंदे
दरम्यान, गृह राज्यमंत्री राम शिंदे यांनी मात्र हा अाराेप फेटाळला अाहे. या प्रकरणाचा तपास याेग्य दिशेने सुरू असल्याचा दावाही त्यांनी केला.