आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्रिपदाच्या तुकड्यासाठी राजू शेट्टींनी गुडघे टेकले-हसन मुश्रीफ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- ज्यांनी स्वाभिमानाच्या गप्पा मारल्या त्या राजू शेट्टींनी मंत्रिपद आणि महामंडळाच्या तुकड्यासाठी भाजप- शिवसेनेसमोर लाचारी पत्करली, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी साेमवारी पत्रकार परिषदेत केला.

मुश्रीफ म्हणाले की, सरकारच्या साखर परिषदेनंतर शेट्टी यांनी शरद पवार यांच्यावर टीका सुरू केली आहे. जर शेट्टी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर खरोखर लढणारे आहेत आणि त्यांच्या मागण्या त्यांचे सरकार मान्य करत नसेल तर पुन्हा ते मुख्यमंत्र्यांकडे जाऊन विनवण्या का करतात? म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेस आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत आंदोलनात उतरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गरिबांचा विमा उतरवणार
पंतप्रधानविमा योजनेचा फायदा करून देण्यासाठी आपल्या मतदारसंघातील खरोखरच गोरगरीब आणि निराधार असणाऱ्यांचा आपण आपल्या मानधनातून विमा उतरवणार असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. तसेच या याेजनेच्या प्रसारासाठी, अंमलबजावणीसाठी मुश्रीफ फाउंडेशनमार्फत नियोजन करणार असल्याचेही ते म्हणाले.