सांगली - सांगलीतील आयर्वीन पुलाला बांधलेल्या पर्यायी पुलाच्या टोलवसुलीला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. याबाबत राज्य शासनाने याचिका दाखल केली होती. अशोका इंफ्रा या कंपनीने कृष्ण नदीवर बांधलेल्या पर्यायी पुलावरील टोलवसुलीची मुदत २०११ मध्येच संपली होती; मात्र, अतिरिक्त खर्चाच्या वसुलीपोटी ठेकेदाराला टोलवसुलीला प्राधिकरणाने परवानगी दिली होती. ही मुदतही २ वर्षांपूर्वीच संपली असताना टोलवसुली सुरूच होती. गेल्यावर्षी कोल्हापूरला टोल आंदोलन सुरू झाल्यानंतर याबाबत वाहतूकदार संघटनेचे महेश पाटील यांनी आवाज उठवला आणि राज्य शासनाने टोलवसुलीला स्थगिती दिली. ठेकेदाराने गेल्या महिन्यात ही स्थगिती जिल्हा न्यायालयातून उठवली. याला राज्य शासनाने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यानुसार उच्च न्यायालयाने टोलवसुलीला स्थगिती दिली आहे.