आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापूर जिल्ह्यात वादळी वारा, गारपिटीसह वळीवाचा जोरदार पाऊस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- हुपरीसह शिरोली येथील औद्योगिक वसाहतीत सोसाट्याच्या वादळी पावसासह मोठ्या प्रमाणात गारपिट झाली. औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारवर्गाने अक्षरश: लहान मुलांप्रमाणे या गारा वेचून खाल्ल्या.

ऐन उन्हाळ्यात गारपिटीसह पाऊस पडल्याने गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या तडाख्याने अंगाची होणारी लाही काही अंशी कमी झाली असून वातावरण स्वच्छ बनले आहे. दरम्यान सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कोल्हापूर शहरातही आभाळ भरून आल्याने आणि वादळी वाऱ्यासह धुळीचे लोट उठल्याने जोरदार वळीवाचा पाऊस पडला.
बातम्या आणखी आहेत...