आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापूरात तासभरच तुफानी पावसाचा कहर, चारचाकी, दुचाकी गेल्या वाहून!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- कोल्हापूर व परिसरात बुधवारी मध्यरात्री ढगफुटी सदृश तुफानी पाऊस पडला. यामुळे पावसाने थोड्याच काळात कोल्हापूरकरांची दैना दैना केली. पाऊस एवढा जोरदार होता की शहरातील रस्त्यांना ओढ्याचे, नदीचे स्वरूप आले होते. काही मिनिटांतच इतका पाऊस पडला की पाण्याचे जोरदार प्रवाहाने चारचाकी आणि दुचाक्या पाहून गेल्या. तर शेकडो घरात, दुकानांत पाणी शिरले. शहरात सर्वत्र पाणीच पाणी दिसत होते. ढगाचा गडगडाट व वा-यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. अंधाराच्या साम्राज्याने नागरिकांत भीतीचे वातावरण तयार झाले होते.
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा, या पावसाचे फोटोज....
बातम्या आणखी आहेत...