आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Homeopathic Doctor On Strike In Sangli , Maharashtra

होमिओपॅथी डॉक्टरांचा सांगलीत बंद; मोर्चा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली: होमिओपॅथी डॉक्टरांना शासकीय सेवेत घ्यावे आणि आपत्कालीन परिस्थितीत होमिओपॅथी डॉक्टरांना अन्य चिकित्सा पद्धतीचा अवलंब करण्याची परवानगी द्यावी, या मागणीसाठी आज होमिओपॅथी डॉक्टरांनी बंद पाळून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
होमिओपॅथीच्या अभ्यासक्रमात अन्य उपचार पद्धतींचाही समावेश आहे. रुग्णाची प्रकृती अचानक खालावल्यास अन्य पद्धतींनी उपचार करता यावेत, या हेतूनेच तसा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. मात्र होमिओपॅथी डॉक्टर्सना अन्य पद्धतीने उपचार करण्यास परवानगी नाही. शासनाने अशी परवानगी द्यावी, यासाठीच आम्ही हे आंदोलन करत असल्याचे होमिओपॅथी प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यश्र चंद्रशेखर जाधव यांनी सांगितले. डॉक्टरांच्या या मोर्चात होमिओपॅथीचे विद्यार्थीही सहभागी झाले होते.