आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • How Could We Accept Conditions Of Accused, Says Sharad Pawar

मग गुन्हेगारांच्या अटी मान्य करायच्या का? शरद पवारांचा प्रतिप्रश्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - भारतात परत येण्याबाबतच्या दाऊदच्या ऑफरबाबत वक्तव्य केल्यानंतर शरद पवारांवर चांगलीच टीका सुरू झाली आहे. पवारांनी दाऊदला भारतात परत आणण्याची संधी दवडली असा आरोपही होत आहे. पण शरद पवारांनी या सर्वांना त्यांच्या शैलीत प्रत्युत्तर दिले आहे. गुन्हेगारांना देशात आणण्यासाठी त्यांच्या अटी मान्य करायच्या का? असा प्रतिप्रश्नच शरद पवारांनी केला आहे. कोल्हापुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत पवारांनी या विषयावर स्पष्टीकरण दिले.

यासंदर्भात बोलताना शरद पवार म्हणाले की, राम जेठमलानी हे माझ्याकडे दाऊदबाबत प्रस्ताव घेऊन आले होते. पण दाऊद त्यावेळी भारतात यायला तयार खरंच होता की नाही, हे माहीत नाही. केवळ जेठमलानी म्हणतात म्हणून त्यावर विश्वास ठेवायचा का? असा सवालही पवारांनी केला. जेठमलानींनी मला हे सांगितले असले तरी, त्यांनी तत्कालीन गृहमंत्री आणि गृहसचिवांशी चर्चा केली होती का? हेही माहिती नसल्याचे पवार म्हणाले.
तसेच दाऊदने काही अटी ठेवल्या होत्या. मग गुन्हेगाराच्या अटी मान्य करणे कितपत योग्य अाहे? असाही सवाल पवारांनी उपस्थित केला. ज्या असंख्य हत्या केल्याचा आरोप आहे, त्याच्या अटी कशा मान्य करायच्या? असे पवार म्हणाले.

दरम्यान, यावेळी बोलताना शरद पवार यांनी शेतकऱ्यांना पूर्णपणे कर्जमाफी देणे गरजेचे असल्याचे म्हटले. निसर्गातील अनियमिततेमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे त्याची या विवंचनेतून सुटका करण्यासाठी कर्जमाफी द्यावी लागणार असल्याचे पवार म्हणाले. तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्याबाबत सरकारच्या भूमिकेवरही पवारांनी बोट ठेवले.