आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • If Not Taking Maratha Reservation Descision After Action Two Congress : Mete

मराठा आरक्षणाबाबत निर्णय न झाल्यास दोन्ही कॉंग्रेसविरोधात भूमिका घेऊ : मेटे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर- मराठा आरक्षणाबाबत कॉँग्रेस व राष्‍ट्रवादीतील मराठा नेते कचखाऊ भूमिका घेत आहेत. सरकारच्या आश्वासनानुसार दीड महिन्यात आरक्षणाचा निर्णय झाला नाही तर नाईलाजाने आम्हांला दोन्ही कॉँग्रेसविरोधात भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा राष्‍ट्रवादी कॉँग्रेसेचे आमदार विनायक मेटे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिला.
अपघातातून बचावल्यानंतर मेटे यांनी बुधवारी महालक्ष्मीचे दर्शन घेतले. तसेच शिवसंग्राम संघटनेचा मेळावाही घेतला. पत्रकार परिषदेत मेटे म्हणाले की, मराठा आरक्षणाला अन्य समाजाच्या नेत्यांचा विरोध मावळला आहे, मात्र अजूनही मराठ्यांचे नेते निर्णय घेत नाहीत. नागपूर अधिवेशनावेळी आंदोलन केल्यानंतर सभापतींच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यात आरक्षण आणि समुद्रात शिवाजी महाराजांचा पुतळा याबाबत अनुक्रमे नारायण राणे आणि जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समित्याही नेमण्यात आल्या. राणे यांच्या समितीने तीन महिन्यात तर पाटील यांच्या समितीने दोन महिन्यात अहवाल देणे ठरले असतानाही या समित्यांच्या नियुक्त्यांचा अद्याप अध्यादेशच निघाला नाही, हे राज्याचे दुर्दैव आहे. म्हणूनच या दोन्ही मागण्यांबाबत वेळेत निर्णय न झाल्यास आमच्याच सरकारविरोधात जनजागरण करणार असल्याचे मेटे यांनी सांगितले.