आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इचलकरंजीत बेकायदा कॉल सेंटर उघडकीस, आंतरराष्ट्रीय कॉल्स लोकल दरात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे बेकायदेशीर यंत्रणा उभारून इचलकरंजी येथे सुरू केलेले कॉल सेंटर एटीएस आणि दूरसंचार विभागाच्या अधिका-यांनी शनिवारी उघडकीस आणले. याप्रकरणी संजय जयपाल कागवाडे व सयाजी एकनाथ माने यांना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत या माध्यमातून भारत सरकार आणि विविध मोबाइल कंपन्यांचे सुमारे २ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी दिली. इचलकरंजीतील अडत पेठ येथील इमारतीत तिस-या मजल्यावर हे कॉल सेंटर सुरू होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या दौ-याच्या पार्श्वभूमीवर घातपाताच्या शक्यतेने एटीएसचा तपास सुरू असताना ही माहिती मिळाल्याने शुक्रवारी या सेंटरवर छापा टाकण्यात आला. त्या वेळी बेकायदा कॉलसेंटर उघडकीस आले.

आधुनिक यंत्रणा पोलिसांकडून जप्त : व्हीओआयपी यंत्रणेच्या माध्यमातून येथून आंतरराष्ट्रीय कॉल लोकल दरामध्ये जोडून दिला जायचा. त्यासाठी आवश्यक मोडेम, सिमबॉक्स, लॅपटॉप जप्त करण्यात आले.

दोन कोटींचे नुकसान
१ जानेवारीपासून संजय याने हे कॉल सेंटर सुरू केले होते. त्या माध्यमातून त्याने भारत सरकारचे व विविध मोबाइल कंपन्यांचे २ कोटी रुपयांचे नुकसान केल्याचा अंदाज या वेळी वर्तवण्यात आला.