आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सीसीटीव्हीमध्येच सापडले पानसरेंचे संशयित मारेकरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - पुरोगामी चळवळीतील नेते काॅ. गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ल्याला साडेतीन महिने उलटून गेल्यानंतर विशेष चौकशी पथकाने (एसआयटी) सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शनिवारी संशयितांची रेखाचित्रे जारी केली आहेत. पानसरे यांच्या हालचालीवर पाळत ठेवून दोघांनी दोन शस्त्रांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्याच्या निष्कर्षाप्रत पोलिस पोहोचले आहेत. एसआयटी प्रमुख अतिरिक्त पोलिस महासंचालक संजीवकुमार वर्मा यांनी ही माहिती दिली. १६ फेब्रुवारी २०१५ रोजी पानसरे दांपत्यावर गोळीबार झाला होता. चार दिवसांनी पानसरे यांचे
निधन झाले होते. शेजारच्या माध्यमिक शाळेच्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांनी संशयितांची रेखाचित्रे तयार केली आहेत. तपासात गती आहे, मात्र अजूनही ठोस धागेदोरे सापडलेले नाहीत, असे वर्मा म्हणाले.