आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पानसरे हत्याप्रकरणात अकाेलकरही अाराेपी, सनातनचा साधक वीरेंद्र तावडेवर पुरवणी अाराेपपत्र दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काेल्हापूर - काॅ. गाेविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील दुसरा अाराेपी व ‘सनातन’चा साधक वीरेंद्र तावडे याच्याविराेधात विशेष तपास पथकाने मंगळवारी पुरवणी अाराेपपत्र दाखल केले. या अाराेपपत्रात सारंग अकाेलकरचाही तिसरा अाराेपी म्हणून समावेश केला अाहे. यापूर्वी समीर गायकवाड याला मुख्य सूत्रधार म्हणून तर वीरेंद्र तावडेलाही संशयावरुन अटक केली हाेती. हे पुरवणी अारेापपत्र ४२८ पानी असून त्यात तावडेवर खुनाचा कट रचणे, खुनामध्ये सहभाग अादी अाराेप ठेवण्यात अाले अाहेत.
काेल्हापुरात १६ फेब्रुवारी २०१५ राेजी दाेन अज्ञात इसमांनी गाेविंद पानसरे यांचा गाेळ्या घालून खून केला हाेता. अप्पर पाेलिस महासंचालक संजीवकुमार यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाकडे या हत्याप्रकरणाचा तपास अाहे. सर्वप्रथम सनातन संस्थेचा साधक समीर गायकवाड याला पाेलिसांनी १६ सप्टेंबर २०१५ राेजी संशयावरुन अटक केली हाेती. १४ डिसेंबर राेजी त्याच्यावर ३९२ पानांचे अाराेपपत्र दाखल करण्यात अाले. दरम्यान, नरेंद्र दाभाेलकर यांच्या हत्याप्रकरणात सीबीअायने १० जून २०१६ राेजी वीरेंद्र तावडेला अटक केली हाेती. दाभाेलकर व पानसरे यांची हत्या सारख्याच पद्धतीने करण्यात अाल्यामुळे एसअायटीने पानसरे हत्याप्रकरणात तावडेला ताब्यात घेतले हाेते. दरम्यान, या प्रकरणातील चाैथा संशयित म्हणून अकाेलवर ठपका ठेवण्यात अाला असून ताे मडगाव बाॅम्बस्फाेटानंतर २००९ पासून बेपत्ता अाहे. लवकरच तावडेच्या दाेषाराेपपत्राची निश्चिती करण्यात येणार अाहे.
बातम्या आणखी आहेत...