आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापुरातील 5 स्पेशालिटी हॉस्पिटल चालवणाऱ्या डॉक्टरांवर आयकर विभागाची धाड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर- शहरातील स्पेशालिटी हॉस्पिटल चालवणाऱ्या पाच नामवंत डॉक्टरांच्या हॉस्पिटल व निवासस्थानांवर आज आयकर विभागाने धाडी टाकल्या. या धाडीमध्ये कोट्यावधीची बेहिशोबी मालमत्ता आढळून आल्याची चर्चा आहे. या धाडसत्रामुळे वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. 

 

आज पहाटे चार वाजता पुणे-औरंगाबाद आयकर विभागाचे शंभरहून जास्त अधिकारी कोल्हापुरात पोहोचले. कोल्हापूर येथील मध्यवर्ती बसस्थानकाजवळील हॉटेल इंटरनॅशनल जवळ स्थानिक शंभरहून अधिक पोलिसांना  बंदोबस्तासाठी सोबत घेऊन 25 वाहने  शहरातील विविध भागात रवाना करण्यात आली. त्यामध्ये राजारामपुरी परिसरातील 8 व्या गल्लीतील एका नामवंत अर्थोपेडीक डॉक्टर व नजीकच्या गल्लीतील त्यांच्या निवासस्थानी तसेच क्रशर चौक, शाहूपुरी, बसंत बहार नजीक असलेल्या हॉस्पिटलमध्ये आणि त्यांच्या निवासस्थानी आयकर खात्याच्या अधिकाऱ्यांनी या धाडी टाकल्या. विशेष म्हणजे पहाटे साखर झोपेत असणाऱ्या डॉक्टरांच्या  निवासस्थानी या धाडी टाकण्यात आल्याने शहरात कोणतीच हालचाल दिसली नाही. आयकर खात्याने टाकलेल्या या धाडींमध्ये कोट्यावधीची बेहिशोबी मालमत्ता आढळून आल्याचे समजते.


रात्री उशिरापर्यंत मालमत्तेची मोजणी सुरूच होती. विशेष म्हणजे पुणे आणि औरंगाबाद विभागातील आयकर अधिकाऱ्यांनी कोल्हापूर आयकर विभागास या धाडी बाबत कोणतीही कल्पना दिली नव्हती. या धाडीमुळे वैद्यकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे.

बातम्या आणखी आहेत...