आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO:सैनिकांनो देशाचे संरक्षण करा, आम्ही तुमच्या परिवाराचे रक्षण करू- मुख्यमंत्र्यांची ग्वाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पालकमंत्री चंद्रकांत पाटील, अभिनेता अक्षय कुमार,गृहराज्य मंत्री दीपक केसरकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर - Divya Marathi
पालकमंत्री चंद्रकांत पाटील, अभिनेता अक्षय कुमार,गृहराज्य मंत्री दीपक केसरकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर
कोल्हापूर - वाघा बॉर्डरनंतर देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात उंच ध्वजस्तंभावर महाराष्ट्र दिनी तिरंगा फडकला. कोल्हापूरमध्ये 303 फूट उंचीच्या ध्वजस्तंभावर सोमवारी सकाळी 5 वाजून 48 मिनिटांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. उंचीत देशात क्रमांक दोनवर असलेल्या या ध्वजस्तंभावर 5 हजार 400 चौरस फुटांचा तिरंगा फडकला.
हा क्षण डोळयात साठवतांना प्रत्येकजण मान उंच करुन आकाशात डौलाने फडकणाऱ्या राष्ट्रध्वजाकडे अभिमानाने पाहात होता. यावेळी  कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक विश्वास नांगरे-पाटील उपस्थित होते.
 
काय म्हणाले मुख्यमंत्री?
दहशतवादी संघटना युवकांना आणि अगदी लहान मुलांना विविध प्रकारचे प्रलोभन देऊन त्यांचे मन वळवतात. दहशतवादी संघटनेत सहभागी झाल्यास आपण तुमच्या कुटंबियांना पैसा पाठवू असे दावे करतात. अशा दहशतवाद्यांपासून देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांच्या पाठिशी आपणही खंबीरपणे उभे राहणे आवश्यक आहे. त्यामुळेच, "सैनिकांनो तुम्ही देशाचे संरक्षण करा आणि आम्ही तुमच्या कुटंबियांची काळजी घेऊ, त्यांचे रक्षण करू." असे महाराष्ट्र दिनी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वस्त केले. 
 
कोल्हापूर रस्ते सौदर्यीकरण प्रकल्पातंर्गत कोल्हापूर पोलिस उद्यानामध्ये 303 फूट उंचीच्या ध्वजस्तंभ उभारण्यात आला आहे. सोमवारी सकाळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते रिमोटव्दारे राष्ट्रध्वज फडकाविण्यात आला. यावेळी पालकमंत्र्यांच्या पत्नी अंजली पाटील, विश्वास नांगरे-पाटील यांच्या पत्नी रुपाली नांगरे-पाटील, पोलिस अधीक्षक महादेव तांबडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, केएसबीपीचे सुजय पित्रे यांच्यासह अनेक मान्यवर, अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.
 
ध्वजस्तंभावर 90 फुट लांब व 60 फुट रुंद ध्वज   
- दुरावस्था झालेल्या पोलिस उद्यानाचा कोल्हापूर रस्ते सौदर्यीकरण प्रकल्पातंर्गत कायापालट करण्यात आला असून या पोलिस उद्यानामध्ये देशातील दुसऱ्या क्रमांकाचा आणि राज्यातील सर्वात ऊंच असा 303 फूट उंचीचा ध्वजस्तंभ उभारण्यात आला आहे.
- या ध्वजस्तंभावर 90 फुट लांब व 60 फुट रुंद अशा 5 हजार 400 चौरस फुटाचा राष्ट्रध्वज फडकाविण्यात आला.
- कोल्हापूर शहराच्या सर्व बाजूंनी हा राष्ट्रध्वज सहज दिसू शकेल, इतका उंच आहे.
 
उद्यानात 1857 ते 1947 चे 'जयगान' 
- उद्यानात 1857 ते 1947 या काळातील भारताच्या स्वातंत्र्यलढयाची मांडणी महालढयाचं महाकाव्य या रुपात 'जयगान' अंतर्गत भव्य प्रदर्शन साकारण्यात आले आहे.
- बलीदान, शांतता आणि समृध्दी याचं प्रतिक असणाऱ्या केशरी, पांढऱ्या आणि हिरव्या रंगातून भित्तीचित्र साकारण्यात आले आहे.
- यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांपासून देशासाठी बलीदान केलेल्या अनेक स्वातंत्र्यवीरांच्या प्रतिमा केशरी रंगामध्ये रेखाटल्या आहेत, तर पांढऱ्या रंगामध्ये महात्मा गांधी आणि गौतम बुध्द यांच्या शांतीचा संदेश देणाऱ्या प्रतिमा आहेत. तसेच हिरव्या रंगामध्ये समृध्दीने नटलेला भारत रेखाटला आहे.
 
सेल्फी पॉइंट आकर्षणाचे केंद्र
- आय लव्ह कोल्हापूर या अक्षरांमधून कोल्हापूरची सर्व वैशिष्टे दर्शविणारा सेल्फी पॉइंट तयार करण्यात आला आहे. तसेच विविध राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमा विनायल प्रिंटींग करुन लावल्या आहेत. तर उद्यानातील विविध फुलझाडांनी उद्यान आकर्षक बनविले आहे. त्यातून केलेल्या रंगीबेरंगी रोषणाईने वातावरण अधिकच मोहक बनविले आहे.
    
ध्वजस्तंभ कोल्हापूरात याचा अभिमान - पाटील
303 फूट उंचीच्या ध्वजस्त्ंभ हा कोल्हापूरच नव्हे तर देशातील जनतेचा अभिमान वाढविणाराच असून हा देखणा प्रकल्प कोल्हापूरात साकारला याचा सार्थ अभिमान वाटतो, अशा शब्दात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कोल्हापूर रस्ते सौदर्यीकरण प्रकल्पातंर्गत कोल्हापूर पोलीस उद्यान अधिक आकर्षक आणि देखणं झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.           

पुढील स्लाईड्सवर पाहा, मुख्यमंत्र्यांचे भाषण आणि अक्षय कुमारच्या उपस्थितीचे फोटो, व्हिडिओ...
बातम्या आणखी आहेत...