आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापुरी चप्पलची ओळख कायम ठेवून बदल स्विकारायला हवा- उद्योगमंत्री

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- कोल्हापुरी चप्पलची ही ओळख कायम ठेवून ग्राहकांच्या मागणीनुसार कलानुरुप बदल केल्यास कोल्हापुरी चप्पलला जागतिक बाजारपेठ सहजपणे काबिज करता येईल. त्यासाठी राज्य सरकार सर्वातोपरी मदत करेल, असे सांगून कोल्हापुरी चप्पल बनवणारे कारागीर केंद्रबिंदु माणून तो कधीही नजरेआड होणार नाही, अशा पध्दतीने योजना आखल्या जातील असे अभिवचन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिले.
 
कोल्हापूर जिल्ह्यातील चप्पल बनविणाऱ्या कारागिरांची एक दिवशीय कार्यशाळा दसरा चौकातील राजर्षी छत्रपती शाहू स्मारक सभागृह येथे आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेचे उदघाटन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याहस्ते करण्यात आले, यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचे सभापती विशाल चोरडीया, आमदार राजेश क्षीरसागर,  खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रिचा बागला, बाटा कंपनीच्या माजी उपाध्यक्ष किरण जोशी,चॅप्पर कपंनीचे हर्षवर्धन पटर्वधन, देशी हँग ओव्हरचे हितेश केंजळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले, कोल्हापूरात येणारा पर्यटक कोल्हापुरी चप्पल खरेदी केल्याशिवाय राहत नाही. पण या चप्पलेचा वापर मात्र प्रसंगानुरुपच होतो. कोल्हापुरी चप्पल दैनंदिन वापरले जावे यासाठी तसेच याचा कठिणपणा कमी करण्यासाठी संशोधन होणे आवश्यक आहे. त्यासाठी ग्राहकाच्या मागणीनुसार, फॅशननुसार चप्पल उत्पादनात बदल करा, जिन्स आणि टी शर्ट वापरणाऱ्या पिढीला कोल्हापुरी चप्पल वापरण्याची सवय लावा, असे सांगून कोल्हापुरी चप्पलेचा व्यवसाय काहीसा अडचणीत आहे असे असतानाही कारागिरांनी खुप मोठा संघर्ष करत ही कला टिकवली, जतन केली याबद्दल कारागिरांचे त्यांनी आभार मानले. कोल्हापुरी चप्पला जगभर ओळख निर्माण करुन देण्यासाठी याच्या पेटंटबाबतचाही विषय मार्गी लावण्यात येईल. बदल स्वीकारुन विकास करत असताना कारागिर केंद्रबिंदू मानला जाईल, तो कधीही नजरेआड व्होवू देणार नाही असे अभिवचनही त्यांनी यावेळी दिले.
 यावेळी त्यांनी राज्याच्या विविध भागामध्ये महत्वाच्या अशा 120 कला आढळून आल्या आहेत. यामध्ये कोकणचा काद्या उद्योग, सावंतवाडीची खेळणी, हुपरीचे चांदीचे दागिने, विदर्भातील बांबू, पैठणची पैठणी, हिमरु चादरी  आदींचा समावेश आहे.  या सर्वांमध्ये कोल्हापुरी चप्प्ल हे अत्यंत महत्‍वाचे उत्पादन आहे. या सर्व पारंपारिक कला चिरकाल टिकवण्यासाठी व ग्रामीण भागातील कारागिरांना स्थैर्य देण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. कौटुंबिक पध्दतीने सुरु असलेल्या या व्यवसायांमध्ये व्यावसायिक स्थैर्य आणणे आवश्यक आहे. बदलत्या कालाचा वेध घेवून या कलात्मक उत्पादनामध्ये व विक्री व्यवस्थेमध्ये बदल केल्यास, कला व कारागिर या दोहोंचाही चांगला फायदा होवू शकतो, असेही सांगितले.
 
विशाल चोरडीय म्हणाले, कोल्हापुरी चप्पल हे महाराष्ट्रासाठी महत्वकांशी उत्पादन आहे. त्याची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. जगात फुटवेअर इंडस्ट्री झपाट्याने वाढत आहे त्यात कोल्हापुरी चप्पलला फार मोठी संधी आहे. 10 ते 15 कोटींचा व्यवसाय असणाऱ्या कोल्हापुरी चप्पलसाठी जागतिकरणाच्या स्पर्धेत टिकायचे असेल तर गा्रहकांच्या गरजांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. सध्या कोल्हापुरी चप्पल 10 ते 15 विशिष्ट डिझायीन्समध्येच उपलब्ध आहेत. बाजारपेठेत असंख्य फॅशन्स उपलब्ध होत आहेत. त्यामुळे प्रत्येक फॅशनसाठी कोल्हापुरी चप्पलचे नवे फुटवेअर दालन निर्माण होण्याची गरज आहे. कोल्हापुरी चप्पल ही दुसऱ्या कोणाची नसून केवळ कोल्हापुरकरांचीच मक्तेदारी आहे. त्यामुळे या उत्पादनाकडे गांभिर्याने पहा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
    
आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, कोल्हापुरी चप्पलबाबत काही गैरसमज आहेत ते दुर करणे आवश्यक असून या व्यवसायला संधी निर्माण करुन देण्यासाठी स्वतंत्र क्लस्टर करावे आणि जीएसटीमधूनही हा व्यवसाय वगळावा.
बातम्या आणखी आहेत...