आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अन्य गावांनीही साेडली बाेरगावमधील शाळा, मसूच्या वाडीप्रमाणे इतर पाच गावेही गुंडगिरीने त्रस्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली- गावगुंडांच्या धास्तीने मसूची वाडीतील मुलींना बाेरगावची शाळा बदलावी लागली, हेच भाेग सांगली जिल्ह्यातील अन्य गावांच्याही वाट्याला अालेले दिसतात. दोन वर्षांपूर्वी नवेखेड येथील मुलींना असाच त्रास झाला होता. त्या वेळी तेथील ग्रामस्थांनीही बोरगावात मुली शिक्षणासाठी पाठवण्याचा निर्णय घेतला, तो आजही कायम आहे. या वर्षी तर नवेखेड ग्रामपंचायतीने ‘गावाबाहेरील कोणत्याही शाळेने ग्रामपंचायतीची परवानगी घेतल्याशिवाय प्रवेशासाठी गावातील कोणत्याही पालकाला भेटू नये,’ असे फर्मानच काढले अाहे. नवेखेड, मसुचीवाडीच्या पावलावर पाऊल टाकत आता गौंदवाडी, बनेवाडी, साटपेवाडी, जुनेखेड या गावांनीही आपली मुले बाेरगावच्या शाळेतून इतरत्र हलवली आहेत.

माजी गृहमंत्री जयंत पाटील यांच्या मतदारसंघातील बोरगाव (जि. सांगली) हे मोठे गाव. आजूबाजूच्या दहा-बारा वाड्या आणि अन्य गावांसाठी बोरगाव म्हणजे बाजारपेठ, शिक्षण, आरोग्य सुविधांसाठी सोयीचे गाव. बापू बिरू वाटेगावकर हे याच गावचे. गावगुंडांच्या अन्यायातूनच बापू बिरूंनी हिंसक मार्ग अवलंबला होता. आजही काही माेजक्या गुंडांच्या कारनाम्यांमुळे हे गाव बदनाम आहे.

या वर्षी बोरगावातील तिन्ही हायस्कूलची पटसंख्या कमी झाली आहे. पटसंख्या वाढावी म्हणून बाेरगावचे शिक्षक शेजारी गावात जाऊन पालकांना विनवण्या करत आहेत; मात्र गावगुंडांचा मूळ प्रश्न सोडवण्यावर कोणीच बोलत नाही. ज्या कारणाने शेजारच्या गावांनी आपली मुले अन्यत्र पाठवली, त्या प्रश्नावर तोडगा काढण्याऐवजी ‘असे प्रकार आमच्या शाळेच्या आवारात घडतच नाहीत,’ असे सांगून या शाळांचे शिक्षक मुख्याध्यापक जबाबदारी झटकून माेकळे हाेताना दिसतात.

शाळांनागावात प्रवेश बंदी
‘आजमसुचीवाडीच्या मुलींना जो त्रास होतो आहे, तो दोन वर्षांपूर्वी आमच्या गावातील मुलींनाही झाला. त्यामुळे आम्ही पालकांचे प्रबोधन करून दहावीपर्यंतची मुले गावातील हायस्कूलमध्येच ठेवली. एवढेच नव्हे तर या वर्षी आम्ही बोरगाव किंवा इस्लामपूरहून प्रवेशासाठी येणाऱ्या शाळांना ग्रामपंचायतीची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय पालकांना भेटायचे नाही, असे फर्मानच काढले. महाविद्यालयीन मुलींना बाेरगावएेवजी इस्लामपूर किंवा वाळवा येथे पाठवले. वाळवा येथील शिक्षणही दर्जेदार असून आमच्या गावापासून हे गाव केवळ पाच किमीवर आहे; पण बसची सोय नसल्याने नाइलाजास्तव मुलींना इस्लामपूरला जावे लागते. आता आम्ही दोन-तीन गावे मिळून स्वतंत्र बसची मागणी करणार आहोत,’ असे नवेखेडच्या सरपंच भारती जाधव यांनी सांगितले.

बाहेरगावच्या मुलांची तुकडी वेगळी
बोरगावातील शाळांचा क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रात चांगला लौकिक आहे. शिष्यवृत्तीसारख्या परीक्षांमध्ये या शाळांनी सातत्याने यश मिळवले आहे. म्हणून शेजारच्या गावातील जागरूक पालक आपल्या मुलांना बोरगावात शिक्षणासाठी पाठवण्यासाठी धडपडत असतात; मात्र इथे बाहेरगावातून आलेल्या मुलांसाठी वेगळी तुकडी केली जाते. एवढेच नव्हे, तर या तुकड्यांना दुय्यम दर्जाचे, हंगामी शिक्षक दिले जातात, अशा तक्रारीही काही विद्यार्थी त्यांच्या पालकांनी बाेलून दाखवल्या.
बातम्या आणखी आहेत...