आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापुरातील महालक्ष्मी मूर्तीवरील रासायनिक संवर्धन संशयाच्या भोवऱ्यात, कारवाईची मागणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापुरातील श्री महालक्ष्मीच्या मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर गुरुवारी अशी देखणी पूजा बांधण्यात आली. छाया : संजय साळवी - Divya Marathi
कोल्हापुरातील श्री महालक्ष्मीच्या मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर गुरुवारी अशी देखणी पूजा बांधण्यात आली. छाया : संजय साळवी
कोल्हापूर - करवीर निवासिनी श्रीमहालक्ष्मी मूर्तीची संवर्धन प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. मूळ मूर्तीवरील असणारी नागमुद्रा या मूर्तीवर आढळत नसल्याने औरंगाबाद येथून आलेल्या पुरातत्त्व विभागाच्या पथकावर कारवाई करावी, अशी मागणी बजरंग दलाने केली आहे. याबाबत जनआंदोलन उभारण्याचाही इशारा देण्यात आला आहे .

रासायनिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बुधवारी देवीचा आधीचा व प्रक्रियेनंतरचा फोटो प्रसिद्धीस देण्यात आला. देवीच्या मूर्तीवर नागमुद्रा असल्याचे फोटो काम सुरू होण्याआधी या पथकाला दाखवले असतानाही या पथकाने या मूर्तीवरील नागमुद्रेचे अस्तित्व नष्ट केले असल्याचा आरोप आता होत आहे.

प्रक्रिया सुरू होण्याआधीच यातील एक तज्ज्ञ हे काम सुरू असताना सोबत घ्यावा, इन कॅमेरा ही प्रक्रिया सुरू ठेवावी अशा मागण्या आम्ही केल्या होत्या. मात्र जिल्हा प्रशासनाने आम्हांला धुडकावून लावले. आता मात्र याबाबत रितसर तक्रार करणार असल्याचे बजरंग दलाच्या वतीने सांगण्यात आले. तर हिंदू जनजागृती समितीने पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत मूर्ती बदलण्यावर आपण ठाम असल्याचे सांगितले.

मूर्ती संवर्धनानंतर गुरूवारी प्रथमच देवीची मूर्ती दर्शनासाठी खुली करण्यात अाली. यानिमित्ताने भाविकांची मोठी गर्दी झाली होती. तत्पूर्वी, सकाळी मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा विधी धार्मिक पद्धतीने पार पडला. शंकराचार्य श्री विद्यानृसिंह भारतीस्वामी व जगदगुरु १००८ श्री सत्यात्मतीर्थस्वामी श्रीमन्ममध्वाचार्य महासंस्थानम श्रीमदुत्तरादिमठ, बेंगलोर व असंख्य भाविकांच्या यांच्या उपस्थितीत हा धार्मिक विधी संपन्न झाला.
पंचगंगेत स्नान
सकाळी ९.१५ वाजता देवीस सहस्रकुंभाभिषेक विधी करून.११.०० वाजता श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते विधिवत पूजा झाली.
दुपारी १२ नंतर महालक्ष्मी देवीची मूर्ती सर्व भक्तांना दर्शनासाठी कायमची खुली करण्यात आली.
विधीनंतर देवीची उत्सव मूर्ती शाही लवाजम्यासह अवभृत स्नानासाठी पंचगंगा नदीकडे गेली. संपूर्ण पालखी मार्गावर फुलांच्या आणि रांगोळ्यांच्या पायघड्या घालण्यात आल्या होता.
पालखी अवभृत स्नान करून पुन्हा मंदिराकडे परत येताना जागोजागी सुवासिनींनी देवीची आरती करून स्वागत करण्यात आले. नंतर पालखी मंदिरात आल्यानंतर आरती करण्यात आली.
बातम्या आणखी आहेत...