आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सांगलीत पुन्हा टोलवसुली, करण्याचे कोर्टाचे आदेश, बांधकाममंत्र्यांना कृती समिती भेटणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली- इस्लामपूर रस्त्यावरील टोलवसुलीला जिल्हा न्यायालयाने पुन्हा हिरवा कंदील दाखवला आहे. सव्वा कोटी रुपयांची देणे देण्यासाठी न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. मात्र ही रक्कम शासनाने भरावी, या मागणीसाठी शुक्रवारी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेण्याचा निर्णय टोलविरोधी कृती समितीने घेतला आहे. अशोका इंफ्रा कंपनीने कृष्णा नदीवर बांधलेल्या पुलाच्या रक्कम वसुलीपोटी दिलेली टोलची मुदत गेल्यावर्षीच संपली आहे. तरीही टोलवसुली सुरू राहिल्याने जनआंदोलन उभारून ही टोलवसूली बंद करण्यात आली. मात्र केलेल्या अतिरिक्त कामापोटी २ कोटी ३० लाख रुपये शासनाने द्यावेत, अशी मागणी ठेकेदाराने केली होती. त्याबाबत नेमलेल्या लवादाने सन २००४ मध्ये शासनाने सव्वा कोटी रुपये ठेकेदाराला द्यावेत, असे स्पष्ट केले; मात्र ते कसे व केव्हा द्यावेत, हे स्पष्ट केले नाही. ही रक्कम मिळावी, यासाठी अशोका बिल्डकॉनने जानेवारी महिन्यात जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली. त्याचा निकाल देताना जिल्हा न्यायालयाने सव्वा कोटी रुपये वसुल करण्यासाठी ठेकेदाराला मुदतवाढ देण्याचा निर्णय दिला.