आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोल्हापूर - भारतापेक्षा अनेक लहान देशांनी केवळ गुणवत्तेच्या आधारे मोठी प्रगती केली. आगामी काळात बदलणार्या परिस्थितीत भारतालाही गुणवत्ताच तारू शकेल. त्यामुळे शिक्षकांनी गुणवत्तापूर्ण अध्यापनाला प्राधान्य देण्याचे आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. राज्य शिक्षक पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्यातील 105 शिक्षकांचा गौरव करण्यात आला. सन्मानचिन्ह आणि 10 हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाने ब्रिटिश कौन्सिलशी करार केला असून त्याद्वारे राज्यातील 67 हजार प्राथमिक शिक्षकांना प्रशिक्षण दिले जात आहे. याअंतर्गत पुढील वर्षी 20 हजार माध्यमिक शिक्षकांना प्रशिक्षण देणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी सांगितले. कोल्हापूरचे पालकमंत्री हर्षवर्धन पाटील, शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान, गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनीही मार्गदर्शन केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बदलत्या शिक्षण पद्धतीचा आढावा घेताना शिक्षकांना सूचनाही केल्या. शिक्षकांचा विद्यार्थी व समाजात आदरयुक्त दबदबा राहिला पाहिजे. पण त्यासाठी शिक्षकांनी हायफाय होण्यापेक्षा वायफायसारख्या तंत्रज्ञानाचा अभ्यास करावा, असेही ते म्हणाले. शिक्षण विभागामध्ये गैरव्यवहारही आहेत. या विभागाच्या खर्चात दीड ते दोन हजार कोटी रुपयांची बचत करता येणे शक्य आहे. वरिष्ठ अधिकार्यांनीच तसे सांगितल्याचे पवार म्हणाले. दरम्यान, खंडपीठाच्या मागणीसाठी गुरुवारी कोल्हापुरात बंद पुकारण्यात आला होता.
आदर्श शिक्षक
प्राथमिक शिक्षक : जाधव मीना कारभारी (श्रीरामपूर जि. अहमदनगर, सोनवणे जगन्नाथ राघोबा (बेलगाव जि. बीड), रामटेके हरिश्चंद्र उमराव (साजापूर जि. औरंगाबाद), मुळे एकनाथ बन्सीधर (केळीगव्हाण जि. जालना). माध्यमिक : शेख झकिरुद्दीन इशाकुद्दीन (शहागंज जि. औरंगाबाद), फटांगरे मारूती मुरलीधर (चंदनापुरी जि. अहमदनगर), जोशी माधव दत्तात्रय (बीड), गायकवाड (जालना).
आदिवासी विभाग प्राथमिक : रहाणे सुभाष यादव (पिंपळगाव माथा जि. नगर), सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका : शनगारे प्रतिभा मधुकर (नेकनूर जि. बीड), बोधले विजयमाला ज्ञानोबा (सातेफळ जि. उस्मानाबाद).
राष्ट्रपती पुरस्कार
नवी दिल्लीत गुरूवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याहस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले. पंडित अवचार (जि. प. शाळा, हिंगोली), मारोती कोटक (अथरवाडी जि. हिंगोली), बाळासाहेब मंडलिक (कोडगाव जि. उस्मानाबाद), संदीप पवार (जरेवाडी, ता. पाटोदा जि. बीड), आबासाहेब मोरे (हांगेश्वर विद्यालय, श्रीगोंदा जि. अहमदनगर), रामदास ठाकर (शेडगाव ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर), डॉ. अशोक कोळी (देवपिंपरी, ता. जामनेर, जि. जळगाव), दिलीप कोथमिरे (धामोडे, ता. येवला, जि. नाशिक), गणेश सोळंके (दानापूर ता. भोकरदन, जि. जालना)
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.