आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोल्हापूरात स्त्रीशक्तीचा एल्गार: अंगणवाडी सेविकांचे रस्तारोकोसह जेलभरो आंदोलन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मानधनात वाढ करावी यासहविविध मागण्यांसाठी 11 सप्टेंबरपासून अंगणवाडी कर्मचारी संघटना राज्यभरात रस्त्यावर उतल्या आहेत. आज दुपारी कोल्हापूर येथील संतप्त अंगणवाडी सेविकांनी रेल्वेस्थानकासमोर रस्तारोको आणि जेलभरो आंदोलन केले. जिल्हा अंगणवाडी कर्माचारी संघा जिल्हाध्यक्ष अथुल दिघे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. 

यावेळी आदोंलकांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महिला व बालकल्यान मंत्री पंकजा मुंढे यांचा धिक्कार करत अंगणवाडी सेविकांनी जोरदार निदर्षने केली.

मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन विविध मार्गांनी सुरूच राहणार असून उद्या (शुक्रवारी) कागल येथे रस्तारोको करण्यात येणार असल्याचे आंदोलकांनी यावेळी सांगितले. रविवारी भाजप आमदार सुरेश हाळवणकर यांच्या घरावर मोर्चा काढून निष्क्रिय सरकारचा निषेध नोंदवण्यात येणार आहे. तसेच सरकारला महागाईच्या राक्षसाला आवर घालण्यात अपयश आले असल्याने मंगळवारी (10 ऑक्टोबर) सकाळी तावडे हॉटेलसमोर महा रस्तारोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा अंगणवाडी सेविकांनी दिला आहे.
बातम्या आणखी आहेत...