आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jayant Patil Every Time Asking To Congress Manikarao Thakare

काँग्रेस पक्षात घेण्यासाठी जयंत पाटील सोनियाजींच्या मागे- माणिकराव ठाकरे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली - कॉँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींचे गाव कोणते म्हणून विचारणारे हेच जयंत पाटील दिल्लीत गेल्यावर मात्र ‘मला काँग्रेसमध्ये कधी घेणार’, म्हणून सोनियाजींच्या मागे लागतात, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी बुधवारी प्रचारसभेत केला.

सांगली, मिरज, कुपवाड महापालिका निवडणुकीतील काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. या निवडणुकीत काँग्रेस व राष्‍ट्रवादी स्वतंत्र लढत आहेत. मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारार्थ सभेत ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी ‘मी उपरा आहे, मग सोनिया गांधींचे गाव कोणते’ असा सवाल केला होता. त्याला उत्तर देताना माणिकराव म्हणाले, ‘‘आमचा मित्रपक्ष म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्र्रेसकडे पाहतो; मात्र त्यांनी आजवर आमचा विश्वासघातच केला आहे. राज्याच्या निवडणुकीत आमच्यासोबत लढायचे व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मात्र सत्ता मिळवण्यासाठी विचारांची सांगड नसणा-या जातीयवादी पक्षांशी युती करायचा उद्योग राष्ट्रवादीने केला. राष्ट्रवादीने आमचाच नव्हे, तर जनतेचाही विश्वासघात केला आहे.

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘राज्याची 50 टक्के जनता शहरांत राहते. म्हणून शहरांचा चेहरामोहरा बदलण्याचा विडा काँग्रेसने उचलला आहे. केंद्राच्या जवाहरलाल नेहरू नगरोत्थान योजनेपासून राज्य शासनाने अनेक योजना राबवल्या आहेत.’