आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सांगलीत ज‍ितेंद्र अाव्हाडांचे भाषण उधळण्याचा प्रयत्न, कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली- राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे भाषण बंद पाडण्याचा प्रयत्न करणारे शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते व संभाजी ब्रिगेड कार्यकर्त्यांमध्ये रविवारी रात्री हाणामारी झाली. यात आठ ते दहा जण जखमी झाले.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार जाहीर केल्याच्या निषेधार्थ शिवसन्मान जागर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. आमदार जितेंद्र आव्हाड, संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव, श्रीमंत कोकाटे यांची भाषणे होणार होती. आव्हाड भाषणाला उभे राहिले. एवढ्यात पाच ते सहा तरुण घोषणाबाजी करतच व्यासपीठावर आले. त्यांनी भाषण बंद पाडण्याचा प्रयत्न केला. या कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते व्यासपीठावर गेले आणि तेथेच दोन्ही गटांत जोरदार हाणामारी झाली. घोषणाबाजी करणाऱ्या शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी चोप दिला. यामध्ये दोन्ही बाजूचे आठ ते दहाजण जखमी झाले.