आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सांगलीच्या महापौरपदी काँग्रेसच्या कांचन कांबळे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली - सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या महापौरपदी काँग्रेसच्या कांचन कांबळे आणि उपमहापौरपदी प्रशांत पाटील-मजलेकर यांची मंगळवारी निवड झाली. दोघांनीही राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा 42 विरुद्ध 25 मतांनी पराभव केला. भाजपप्रणीत स्वाभिमानी विकास आघाडीचे 11 सदस्य तटस्थ राहिले.

गेल्या महिन्यात झालेल्या मनपा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा दारुण पराभव करून काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवली होती. महापौरपद अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने तीन अर्ज दाखल झाले होते.

ऐनवेळी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या एका उमेदवाराने माघार घेतल्यानंतर काँग्रेसच्या कांचन कांबळे आणि राष्ट्रवादीचे महेंद्र
सावंत यांच्यात लढत झाली. यात कांबळे यांनी सावंत यांचा पराभव केला. उपमहापौरपदासाठी काँग्रेसचे प्रशांत पाटील-मजलेकर आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे धीरज सूर्यवंशी यांच्यात लढत झाली. त्यात मजलेकर विजयी झाले.