आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MH Pride: फुलांचा हा नजारा युरोपातील नव्हे पश्चिम घाटातील, पाहा PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातारा- या फुलांचे फोटो पाहून तुम्हाला युरोपातील वाटत असतील तर ते चूक आहे कारण ही फुले आहेत आपल्या सातारा जिल्ह्यातील कास पठार ठिकाणावरील आहेत. ज्याला महाराष्ट्रातील 7 आश्चर्यापैकी एक मानले जाते. सह्याद्रीच्या पश्चिम घाटात पसरलेल्या साता-याच्या पश्चिमेकडे 22 किलोमीटर अंतरावर कासचे पठार आहे. या पठारावर पावसाळा सुरू झाल्यावर असंख्य प्रकारची रानफुले फुलतात. मागील तीन महिन्यापासून या पठारावर पाऊस पडत असल्यामुळे सध्या येथे विविध प्रकारची रानफुले फुलली आहेत. पावसाळ्यात पर्यटकांची इथे खूप गर्दी असते. आताही कास पठारावर रानफुले पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करत आहेत.
 
कास हा जैवविविधतेचा हॉटस्पॉट आहे. येथे अनेक दुर्मीळ प्रजाती येथे सापडल्याने या पठाराचा 2012 साली युनेस्को जागतिक वारसा स्थळांच्या संरक्षित यादीत समावेश केला गेला आहे. हे पठार ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात येथे फुलणाऱ्या विविध प्रकारच्या रानफुलांसाठी आणि फुलपाखरांसाठी प्रसिद्ध आहे. पठाराची समुद्रसपाटीपासूनची उंची 1000 ते 1250 मीटर आणि क्षेत्रफळ अंदाजे 10 चौरस किमी आहे. कास पठारावर 280 फुलांच्या प्रजाती व वनस्पती वेली, झुडपे आणि इतर प्रजाती मिळून 850 प्रजाती आढळतात. येथे नष्टप्राय होण्याचा धोका असलेल्या 280 पुष्प प्रजातींपैकी 39 प्रजाती आढळतात. येथे सुमारे 59 जातींचे सरिसृप (सरपटणारे प्राणी) आढळतात.
 
कास पठाराच्या दक्षिणेला कास तलाव आहे. या तलावातूनच सातारा शहराला पाणीपुरवठा होतो. कास तलावाच्या भोवताली घनदाट जंगल आहे. ते सज्जनगड किल्ला आणि कण्हेर धरण यांच्यामध्ये आहे. कास तलावाच्या दक्षिणेला 30 किमी अंतरावर कोयना प्रकल्प आहे.
 
तलावाच्या जवळच वजराई धबधबा आहे. हा भारतातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक आहे. कास पठाराजवळ कुमुदिनी तलाव आहे. सज्जनगडापासून 13 किमी अंतरावर ठोसेघरचा आणखी एक धबधबा आहे. सह्याद्रीच्या डोंगर रांगाप्रमाणे ठोसेघरला देखील धबधब्यांच्या रांगा आहेत. त्यातील एका धबधब्याची उंची साधारणपणे 200 मीटर आहे. 
 
पुढे स्लाईडद्वारे पाहूया, कास पठारावर फुललेल्या सुंदर अशा रानफुलांचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...