Home »Maharashtra »Western Maharashtra »Kolhapur» Kmt Bus Accident 3 Died

ताबूत विसर्जन मिरवणुकीत केएमटी बस घुसली; 2 ठार 18 जखमी, संतप्त जमावाने बस पेटवली

ताबूत विसर्जन मिरवणुकीत कोल्हापूर महानगरपालिका परिवहनची (केएमटी) बस घुसून 2 जण ठार झाले तर 18 जण गंभीर जखमी झाला.

दिव्य मराठी वेब टीम | Oct 02, 2017, 15:13 PM IST

  • संतप्त जमावाने पेटवलेली केएमटी बस.
कोल्हापूर-ताबूत विसर्जन मिरवणुकीत कोल्हापूर महानगरपालिका परिवहनची (केएमटी) बस घुसून 2 जण ठार झाले तर 18 जण जखमी झाले आहेत. यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. तानाजी भाऊ साठे (वय 30) आणि सुजल भानुदास अवघडे (वय 15) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. जखमींना तात्काळ येथील छत्रपती प्रमिलाराजे जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी केएमटी चालकाला निलंबित करण्यात आले असून वाहतूक नियंत्रक आणि वर्कशॉप इंजिनिअरला सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. राजारामपुरी एरिया वगळून सुरू झालेली बस सेवा पुन्हा बंद करण्यात आली आहे.
रात्री 8 च्या सुमारास हा अपघात शहरातील गर्दीने गजबजलेल्या पापाची तिकटी येथे झाला. घटनेनंतर संतप्त जमावाने केएमटी बस पेटवून दिली. या घटनेने परिसरातील वातावरण तणावपूर्ण बनले आहे. केएमटी बसचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
कोल्हापूर शहरात आज सायंकाळी ताबूत विसर्जन मिरवणूक होती. या मिरवणुकीतील काही पंजे वाद्यांच्या गजरात पंचगंगा नदीकडे निघाले होते. त्यावेळी शिवाजी चौकाकडून गंगावेशीकडे जात असलेल्या केएमटी बसचे ब्रेक निकामी झाल्याने ही बस ताबूत विसर्जन मिरवणुकीत घुसली. या दुर्दैवी घटनेत 2 जणांना जीव गमवावा लागला आणि 18 जण जखमी झाल्याने तीन हजारहून अधिक लोकांचा जमाव घटनास्थळी जमला आणि त्या जमावाने दगडफेक करून बसची तोडफोड केली आणि ही बस पेटवून दिली. यावेळी दुर्घटनेची माहिती मिळाल्याने घटनास्थळी आलेल्या अग्निशमन दलाच्या गाडीची काच देखील फोडण्यात आली. परिस्थिती अधिक तणावपूर्ण बनल्याने जलद कृती दलाच्या दोन तुकड्या घटनास्थळी तैनात करण्यात आल्या आहेत.
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

Next Article

Recommended