आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापूरात मिल्ट्री कॅम्पमध्ये गोळीबारात जवानाचा मृत्यू, घातपात की आत्महत्या?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- कोल्हापूर शहरातील टेंबलाईवाडी परिसरात असलेल्या लष्करी कॅंम्पात झालेल्या गोळीबारात एका जवानाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हा घातपात आहे की अपघात याचा उलगडा होऊ शकला नाही. जवानाने आत्महत्या तर केली नाही ना याचीही चौकशी लष्करी अधिकारी करीत आहेत.
दत्तात्रय रंगराव मोरे (28) असे मृत जवानाचे नाव आहे. दत्तात्रय काल ड्युटीवर असताना टीए बटालियनच्या कार्यालक्षात अचानक गोळीबार झाल्याचा आवाज आला. त्यानंतर लष्करी अधिका-यांनी घटनास्थळी धाव घेतली असता दत्तात्रय याच्या छातीत गोळ्या लागल्याचे व तो गंभीर जखमी झाल्याचे निदर्शनास आले. या अधिका-यांनी दत्तात्रयला लागलीच कोल्हापूरातील एका खासगी रूग्णालयात दाखल केले. मात्र, दोन-तीन तासातच त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, हा गोळीबार घातपात होता की अपघात याची चौकशी सुरु आहे. याचबरोबर दत्तात्रय याने आत्महत्या तर केली नाही ना याचीही माहिती घेण्यात येत आहे. लष्करातील त्याच्या सहका-यांकडून मागील काही दिवसात दत्तात्रय कसा राहत, वागत होता, तो तणावात होता का, वरिष्ठ किंवा सहका-यांशी त्याचे वाद झाले होते का याची माहिती घेण्यात येत आहे. याचबरोबर दत्तात्रय याची कौटुंबिक माहिती घेण्यात येत आहे. घरी काही समस्या होती का याचीही चौकशी केली जाणार आहे. दरम्यान, दत्तात्रयच्या छातीत किती अंतरावरून गोळ्या घातल्या हे पोस्टमार्टम अहवालातून उघड होईल व ही आत्महत्या आहे की घातपात याचे सत्य पुढे येईल असे लष्करी अधिका-यांनी म्हटले आहे.