आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापूर: आश्रमशाळेतील मुले बेकायदा गोव्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - शहरातील एका आश्रमशाळेतील ११ मुलांना बेकायदेशीररीत्या गोव्यात नेऊन ठेवल्याचे उघडकीस आले अाहे. याबाबत चौकशीसाठी कोल्हापूर पोलिसांचे पथक गोव्यात दाखल झाले आहे. या मुलांशी काही गैरवर्तणूक करण्यात आली आहे का याचीही तपासणी पोलिस करणार आहेत. आगापे या संस्थेमार्फत चालवण्यात येत असलेल्या आश्रमशाळेत २० मुले आणि मुली राहत होत्या. त्यापैकी ९ ते १८ वयोगटातील ११ मुलांना गोव्यात नेऊन तेथे ब्रिटिश नागरिक टोमोटी जेडेस याच्या ताब्यात देण्यात आले. कोल्हापुरातील ही संस्था कोरियन नागरिक डेव्हिड किमो आणि स्थानिक इम्युयल गायकवाड हे दोघे जण बेकायदेशीररीत्या चालवत असल्याचे उघडकीस आले आहे.
बातम्या आणखी आहेत...