आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विविधपक्षांच्या एकजूटीने टोलविरोधी मोर्चात 50 हजार कोल्हापूरकर सहभागी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर - विविध पक्षांचे झेंडे फडकावत हजारो करवीरकरांनी टोलला विरोध केला आहे. कोल्हापूर कृतीसमितीच्या वतीने जिल्ह्याधिकारी कार्यालायवर विराट मोर्चा काढणयात आला. यात टोलरुपी राक्षसचा जिवंत देखावा तयार करण्यात आला होता. सर्वपक्षीय नेत्यांनी पक्षाभिनिवेश बाजूला ठेवत टोलला विरोध केला.

टोलला विरोध करण्यासाठी जवळपास 50 हजार नागरिक रस्त्यावर उतरले होते. या मोर्चामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

मोर्चात ऑटो रिक्षा, टेम्पो, बससह नागरिक सहभागी झाले होते. शहरातील व्यापारी, अधिकारी, कर्मचारी आणि शाळकरी मुले मोर्चात सहभागी झाल्यामुळे दुकाने बंद होती आणि कार्यालये व शाळांमध्येही शुकशुकाट होता.

आयआरबीच्या विरोधात मोर्चेकरांनी जोरदार घोषणाबाजी केली.

कोल्हापूर शहरात ‘बीओटी’ तत्त्वावर उभारण्यात आलेल्या अंतर्गत रस्त्यांचा टोल भरणार नाही, असा आक्रमक पवित्रा टोलविरोधी कृती समितीने घेतला आहे. मात्र सरकारने टोलवसुली होणारच असल्याचे जाहीर केल्याने कोल्हापुरात अनेकदा हिंसक आंदोलने झाली आहेत. टोलविरोधी कृती समितीत सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते सहभागी असल्याने सरकारची या प्रकरणात चांगलीच गोची झाली आहे. या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी जून मध्ये मुंबईत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दांडी मारली होती.

शहरांतर्गत टोल वसूल करणारे कोल्‍हापूर हे संपूर्ण भारतातील एकमेव शहर आहे. मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम अन्‍वये शहरातील रस्‍ते बांधणे व ते सुस्थितीत ठेवण्‍याची जबाबदारी महानगरपालिकेची आहे. महापालिका नागरिकांकडून नियमित कर घेत असतानाही टोलचा भुर्दंड नागरिकांवर का लादला जातो ? असा सवालही मोर्चेकरांनी उपस्थित केला आहे.