आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोल्हापुरातील स्फोट पैशांच्या देवाणघेवाणीतून, एका युवतीसह आरोपी अटकेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - कोल्हापूरशहरातील शाहू टोल नाक्याजवळ २३ ऑगस्ट रोजी झालेल्या किरकोळ बॉम्बस्फोटप्रकरणी अविनाश बाबूराव बन (वय ३३, रा. तुळजाभवानीनगर, कोल्हापूर) आिण ज्योती ऊर्फ प्रीती राजेंद्र पवार (रा. भीमनगर पेठ, जि. सांगली) या दोघांना कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली. व्याजाने घेतलेल्या पैशासाठी मित्राने तगादा लावल्याने त्याला धडा शिकवण्यासाठी हा बॉम्बस्फोट घडवून आणल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे.
२३ आॅगस्ट रोजी खाद्यपदार्थच्या गाड्यावर हा स्फोट झाला होता. अविनाश श्रीधर ऊर्फ बबल्या मारुती खुटाळे (रा. उजळाईवाडी) या दोघा मित्रांनी मोबाइल कार्ड रिचार्ज करून देण्याचा व्यवसाय सुरू केला होता. दरम्यान, अविनाश याने श्रीधरकडून अडीच लाख रुपये व्याजाने घेतले होते. ती रक्कम परत देण्याचा तगादा श्रीधरने लावला होता. त्याच्या मागणीला कंटाळून अखेर श्रीधरला धडा शिकवण्यासाठी अविनाशने श्रीधरच्याच गॅरेजमधील बॉल बेअरिंग आणि अन्य साहित्यापासून साधा बॉम्ब तयार केला.

यासाठी अविनाशने त्याचा मित्र अभय नितीन पारीख (कोल्हापूर) याची मैत्रीण ज्योती हिला बोलावून घेतले. त्यानंतर तिला श्रीधरला फोन करायला लावला बोलावून घेण्यास सांगितले. त्यानुसार ज्योतीने श्रीधरला बऱ्याचदा फोनही केले. मात्र, दोन-तीन वेळा सांगूनही तो आल्याने हा बॉम्ब त्याच्या चायनीजच्या गाड्यावर ठेवून दिला. २३ आॅगस्टला संध्याकाळी श्रीधरने नेहमीप्रमाणे गाडा उघडला. तेव्हा त्याला गाड्यात एक पिशवी दिसली. ती पिशवी कचऱ्याची समजून त्याने उचलली त्याच वेळी त्यात स्फोट झाला. मागील आठ दिवसांपासून याचा तपास सुरू होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक अनिल देशमुख यांच्या नेतृत्वात तपास पार पडला.

शिक्षिकेच्या मुलाने बनवला बॉम्ब
धक्कादायकप्रकार म्हणजे अविनाश हा मूळचा कागल येथील असून त्याची आई तेथे महाविद्यालयात शिक्षिका म्हणून कार्यरत होती, तर वडील रायगड जिल्ह्यात प्राचार्य म्हणून काम करत होते. मात्र, पदवीधर असलेल्या अविनाशने वाईट संगतीने अनेक बेकायदेशीर कृत्ये केली हाेती. पेण येथील एका घरफोडी खुनाप्रकरणीही त्याच्यावर गुन्हा दाखल असल्याचे उघडकीस आले आहे. त्याने फेसबुकवरून मैत्री झालेल्या आग्रा येथील एका युवतीशी विवाह केला. मात्र, नंतर त्यांचे पटेनासे झाल्याने ती पुन्हा आग्रा येथे गेली आहे. त्यामुळे वैतागलेल्या अविनाशने हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात आले.