आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापुरहून पळालेला मुलगा जालंधरमध्ये

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापुर - वडीलांशी वाद झाल्याने घरातून पळून गेलेला एक 14 वर्षीय मुलगा थेट जालंदरमध्ये (पंजाब) सापडला. शहरातील आर्या स्कूलमध्ये शिकणारा मुलगा काही दिवसांपूर्वी घरात वाद झाल्याने रेल्वेत बसून जालंदरला पोहचला. तिथे लोकांकडे मदत मागून तो पोट भरत असे व रस्त्याच्या कडेला झोपत असे. सोमवारी सुभेदार वस्सन सिंह यांना हा मुलगा ट्रक वाल्यांकडे काही मागतांना दिसला.
चौकशी केली असता त्याने आपले नाव बॉटम असल्याचे सांगितले. वस्सन सिंह यांनी त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी आर्या स्कूलमध्ये फोन करून माहिती दिली. बुधवारी शाळेच्या दोन कर्मचार्‍यांनी जालंधरमध्ये येऊन त्याला घेऊन गेले.