आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धावत्या बसमध्ये चालकाला हार्ट अटॅक: 3 कारसह 8 दुचाकी चिरडल्या; दोघे जागीच ठार, 10 जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - एसटी महामंडळाच्या एका सुसाट बसने चक्क 3 चारचाकी वाहनांसह 8 बाइक चिरडल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी येथील बस स्थानकावर घडला आहे. या भयंकर अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू झाला. तसेच इतर 10 जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातही जखमींपैकी 2 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. चालकाला हृदय विकाराचा धक्का बसल्याने हा अपघात घडला आहे. 
 
त्या चालकाला ब्रेन ट्युमर
 त्या चालकाला ब्रेन ट्युमर असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आल्याची माहिती वैद्यकीय अधिक्षक डॉ.शिशिर मिरगुंडे यांनी सांगितले. चालक रमेश कांबळे याने मद्य प्राशन केले होते का याच्या तपासणीसाठी त्याच्या रक्ताचे नमुने सुद्धा घेण्यात आले असून येत्या दोन तीन दिवसात त्याचा वैद्यकीय अहवाल येणार आहे. हुपरी-रंकाळा बसस्थानक मार्गावर बस चालक रमेश कांबळे याने अपघात झालेल्या दिवशी तब्बल 72 किलोमीटर अंतराची ड्युटी केल्याचे आणि यासाठी त्याला कोणताही जादा कामाचा ताण नसल्याचे ही वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले आहे. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या अन्य 9 जणांची प्रकृती स्थिर असून त्यांच्या जीविताला कोणताही धोका नसल्याचे वैद्यकीय अधिकऱ्यानी सांगितले.
 
 
मृतांची नावे 
1 - देवास शामराव घोसारवाडे
2 - सुहास युवराज पाटील
 
अपघातात जखमींची नावे
1 - बस ड्रायव्हर - रमेश सहदेव कांबळे  (रा.कांडगाव)
2 - राजाराम पाटील (पो.हे.काँ)
3 - राजाक्का गुलाब पाटील  (वाशी)
4 - प्रतीक्षा योगेश नाळे (सांगरूळ)
5 - बाबुराव केशव वडणगे (शाहूपुरी)
6 - विक्रम विठ्ठल घोडके (पाचगाव)
7 - श्रीपती ईश्वर बवळकर (दोनवडे)
9 - पांडुरंग गुड्डू पाटील   (दोनवडे)
10 - सतीश कृष्णात पाटील (गगनबावडा)
 
पुढील स्लाईडवर पाहा... घटनास्थळाचा व्हिडिओ...
 
बातम्या आणखी आहेत...