आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विचित्र योगायोग: धावत्या बसमध्ये चालकाला हार्टअटॅक; संतोष माने प्रकरणातील \'ती\' बस हीच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एमएच 14 बीटी 1532 ही बस म्हणजे कर्दनकाळ ठरली आहे. 25 जानेवारी 2012 रोजी पुण्यात आणि  काल, 24 जानेवारी 2017 रोजी कोल्हापूरात याच एक सारखाच हाहाकार माजवला. दोन्ही अपघात एकाच बसने घडवले आहेत.

25 जानेवारी 2012 रोजी स्वारगेट आगारातून बाहेर आणून संतोष माने या माथेफिरू चालकाने बस  बेफानपणे चालवत तब्बल 35 वाहनांना ठोकरले होते. 9 जणांना चिरडले होते. नंतर ही बस कोल्हापूर आगाराकडे सोपवण्यात आली होती. तीच एसटी बस घेऊन हुपरी रंकाळा मार्गावर प्रवासी वाहतूक करणारे चालक रमेश सहदेव कांबळे यांना धावत्या बसमध्ये हृदयविकाराचा झटका आला आणि कोल्हापूरकरांनी उमा टॉकीज चौकात भीषण थरार आणि भयनाट्य अनुभवले. हा थरार दोन जणांचा जीवावर बेतला तर  9 जण जखमी झाले.

पाच वर्षांनंतर अगदी तशाच पद्धतीचा थरार करत  एमएच 14 बीटी 1532 बसने कोल्हापूर शहरात केलेल्या अपघातामुळे अंधश्रद्धा आणि उलटसुलट चर्चेला उत आला आहे.

मृतांच्या वारसांना प्रत्येकी 10 लाख रुपये
कोल्हापुरात काल (बुधवारी) झालेल्या या भीषण अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या दोघांच्या वारसांना प्रत्येकी 10 लाख रुपये देण्याची घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली आहे. तसेच जखमींना सुद्धा तातडीची मदत देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

पुढील स्लाइडवर वाचा... धावत्या बसमध्ये चालकाला हार्टअटॅक.. दोन ठार, 3 कारसह 8 दुचाकीचा चेंदामेंदा
बातम्या आणखी आहेत...