आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजर्षी शाहू महाराजांनी सुराज्य माॅडेल उभारले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - भारतातील साडेपाचशे संस्थानापैकी करवीर संस्थान हे एक छोटे संस्थान असताना स्वराज्याचे सुराज्य कसे करावे याचे माॅडेल छत्रपती शाहू महाराजांनी उभारले असे गौरवोदगार माजी गृहराज्यमंत्री व ज्येष्ठ समाजवादी विचारवंत भाई वैद्य यांनी काढले. येथील राजर्षि शाहू स्मारक मेमोरियल ट्रस्टच्यावतीने वैद्य यांचा शाहू पुरस्काराने गौरव करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

एक लाख रुपये, मानपत्र देऊन यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या व ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांच्या हस्ते वैद्य यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना वैद्य यांनी शाहू कार्याचा आढावा घेतानाच जागतिकीकरण आणि जमातवाद ही आजच्या जगापुढील महत्वाची आव्हाने असल्याचे सांगितले. ज्या दिवशी शाहू महाराजांचे विचार हा देश विसरले त्यावेळी देशाचे वाटोळे होईल असे मत व्यक्त करतानाच शेतकर्‍यांच्या आत्महत्यांविषयी त्यांनी चिंता व्यक्त केली.

सरकार वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चांगल्या योजना राबवत असले तरी त्या सर्व बाबतीत आधीच शाहू महाराजांनी काम करून ठेवले असल्याचे यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी याप्रसंगी सांगितले.

कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अमित सैनी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार, इतिहास संशोधक जयसिंगराव पवार उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...