आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kolhapur Collector Ordered To Raju Sheety To Fill 80 Lakh Ruppes

ऊस आंदोलन नुकसानीचे 80 लाख रूपये भरण्याचे राजू शेट्टींना फर्मान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- महायुतीत सामील झालेले खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गेल्या वर्षी केलेल्या ऊस आंदोलनादरम्यान करण्यात आलेल्या नुकसानीची 80 लाख रूपयांची भरपाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. कोल्हापूरचे जिल्हाधिका-यांनी या संघटनेचे प्रमुख या नात्याने राजू शेट्टींनी ही भरपाई भरावी असे फर्मान काढले आहे. तसेच ही सर्व रक्कम एक महिन्याच्या आत भरावी नाहीतर राजू शेट्टींच्या वैयक्तिक मालमत्ता व संपत्तीवर सरकार बोजा चढवेल, असे जिल्हाधिका-यांनी आपल्या नोटिसीत बजावले आहे.
कोल्हापूरच्या जिल्हाधिका-यांनी राजू शेट्टींसह यांच्यासह सुमारे 80 कार्यकर्त्यांना नोटिस बजावण्यात आली आहे. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजू शेट्टींसह सदाभाऊ खोत अडचणीत आले आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या काळात स्वाभिमानीची आर्थिक रसद तोडण्याची शक्यता आहे. दरम्यान, राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादीवर टीका करण्याची संधी सोडली नाही. शरद पवारांच्या विरोधात वक्तव्य केल्यानंतर झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यात आली नाही. मनसेने केलेल्या आंदोलनातील नुकसानीची भरपाई केली नाही मग आमच्यावरच का कारवाई करता असा सवाल शेट्टींनी उपस्थित केला आहे. तसेच ही राजकीय प्रेरित कारवाई आहे. जिल्हाधिका-यांनी यासाठी माझे म्हणणे ऐकून घेतले नाही तसेच तशी संधी दिली नाही अशीही त्यांनी या नोटिस पाठविण्याबाबत टीका केली.