आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kolhapur Corporation Sealed Eight Business Men Account

कोल्हापूर महापालिकेचा आठ व्यापा-यांच्या बँक खात्यांना सील

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर - कोल्हापूर महापालिका आयुक्तांनी आठ व्यापा-यांची बँक खाती सहा महिन्यांसाठी सील केली. एलबीटी कर भरण्‍यासाठी वारंवार निर्देश देवून ही संबंधित व्यापा-यांनी कोणताही प्रतिसाद न दिल्याने आयुक्त विजयालक्ष्‍मी बिदरी यांनी कारवाई केली आहे.


या आठ व्यापा-यांमध्‍ये स्वस्तिक सॉ-मिल अ‍ॅण्‍ड‍ टिंबर डेपो, श्री लक्ष्‍मी हार्डवेअर अ‍ॅण्‍ड प्लायवूड,न्यू इंडिया मोटर्स, अ‍ॅटो अं‍तरिक्ष सुमो टुल्‍स अ‍ॅण्‍ड अ‍ॅक्सेसरीज, फ‍िनेक्स एंटरप्राइजेस, जय भवानी फॅशन स्टेशन, ऑडीज यांचा समावेश आहे. या आर्थिक वर्षा करिता महापालिकेने एलबीटीच्या माध्‍यमातून 66 कोटींचे उद्दिष्‍टे ठेवले होते. आतापर्यंत 71 कोटी 87 लाखांची वसूली झाली असल्याचे महापालिकेच्यावतीने सांगण्‍यात आले आहे.