आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवृत्त प्राध्यापकाच्या घरावर दरोडा; धारदार शस्त्रांनी पत्नीचा खून, पती गंभीर जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रविवार आणि सोमवारच्या मध्यरात्रीनंतर हा प्रकार घडला. - Divya Marathi
रविवार आणि सोमवारच्या मध्यरात्रीनंतर हा प्रकार घडला.
कोल्हापूर - शिरोळ तालुक्यात उदगाव येथील शिरोळ मार्गावर मदरसाजवळ राहणाऱ्या बाबुराव निकम या निवृत्त प्राध्यापकाच्या घरावर मध्यरात्री धाडसी दरोडा पडला. यावेळी विरोध करणाऱ्या प्राध्यापक निकम यांच्या पत्नी अरुणा निकम यांची दरोडेखोरांनी  धारदार शस्त्रांनी वार करून हत्या केली. तसेच प्राध्यापक बाबुराव निकम यांना गंभीर रित्या जखमी केले. यानंतर घरातील 24 तोळे सोने आणि रोख 50 हजारांची रक्कम लंपास केली. ही घटना रविवार आणि सोमवारच्या मध्यरात्री घडली. घटनेची नोंद  जयसिंगपूर पोलीस ठाण्यात झाली आहे.
 
 
निवृत्त प्राध्यापकाची प्रकृती चिंताजनक
- विशेष म्हणजे प्राध्यापक निकम यांच्या घरी त्यांची दोन मुले-सुना असतानाही हा दरोडा पडल्याने आणि त्यात अरुणा निकम यांची हत्त्या झाल्याने परीसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
- दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत प्राध्यापक बाबुराव निकम हे गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले. 
- या घटनेचे वृत्त कळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली. 
घटनास्थळी जयसिंगपूरचे पोलिस उप-अधीक्षक रमेश सरवदे, इचलकरंजीचे पोलिस उप-अधीक्षक विनायक नरळे, इचलकरंजी एलसीबी पथक आणि श्वान पथक दाखल झाले. 
- पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून बॉडी शवविच्छेदनसाठी पाठवली आहे. अधिक तपास जयसिंगपूर पोलिस करत आहेत.
- एका वर्षापूर्वी हातकणंगले तालुक्यातील रुकडी येथे देखील याच पद्धतीने डॉक्टर दाम्पत्याचा खून झाला. या खून प्रकरणाला एक वर्ष होऊन देखील पोलिसांकडून अद्याप आरोपींचा शोध लागलेला नाही.
बातम्या आणखी आहेत...