आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापूर जिल्ह्यात एटीएम फोडून २५ लाख लंपास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - शहरापासून६० किलोमीटर अंतरावरील गारगोटी शहरातील दोन एटीएम सेंटर फोडून चोरट्यांनी २५ लाख रुपये लंपास केले. साेमवारी रात्री ते च्या दरम्यान ही घटना घडली. दोन्ही एटीएम मशीन्स गॅस कटरने कापून त्यातील रोकड लंपास केली आहे. किमान चार जणांच्या टोळीने हे कृत्य केले असल्याचा पोलिसांचा संशय आहे.
गारगोटी हे तालुकास्तरीय शहर असून या छोट्या शहरामध्ये चोरट्यांनी हे धाडस केल्याने पोलिसांचीही धावपळ उडालीआहे. दोन्ही एटीएम मशीन्स गॅस कटरने तोडेपर्यंत आजूबाजूचे लोक काय करत होते, तसेच सुरक्षा रक्षक कुठे होता यासारखे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. तातडीने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.
बातम्या आणखी आहेत...