आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kolhapur District Ajara Tahsildar Ujjwala Sarote Arrested

महिला तहसीलदार लाच घेताना अटकेत, रेशन दुकानदारांकडून उकळले 25 हजार रुपये

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - जिल्ह्यातील आजरा येथील तहसीलदार उज्ज्वला सोरटे यांना 25 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकार्‍यांनी अटक केली. सोरटे यांना शासकीय निवासस्थानीच पकडण्यात आल्याने आठवडा बाजारात याची जोरदार चर्चा होती.
मूळच्या बारामती येथील रहिवासी असलेल्या सोरटे या पाच महिन्यांपूर्वीच आजरा तहसीलदार म्हणून रुजू झाल्या होत्या. आल्या आल्या त्यांनी गौण खनिज करणार्‍या गाड्या ताब्यात घेऊन दरारा निर्माण केला होता. विनापरवाना वाळू खणणार्‍याचा ट्रॅक्टर जप्त केला होता, परंतु तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी गोळा करून दिलेली 25 हजारांची लाच स्वीकारताना त्यांना अटक करण्यात आली.
भादवणवाडीच्या (ता. आजरा) स्वस्त धान्य दुकानदाराने याबाबत तक्रार केली होती. याआधीचे तहसीलदार बाबूराव पोवार यांनी कोट्यवधी रुपयांची शासकीय जमीन फुकापासरी वाटल्याबद्दल त्यांची विभागीय चौकशी सुरू असतानाच त्यांच्या जागी आलेल्या सोरटे याही भ्रष्टाचारात अडकल्या आहेत.