आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

EXCLUSIVE: वाहतूक पोलिसांच्या बनावट पावत्यांचा घोटाळा; मॅनहोलजमध्ये सापडला ढीग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - शहर पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण शाखेतील नो पार्किंग मधील वाहने उचलणाऱ्या क्रेन वरील पोलिसांचा बनावट पावत्यांद्वारे दररोज सुरू असणारा महा घोटाळा आज चक्क ऑनलाइन दिव्य मराठीच्या कोल्हापूर टीम ने उघडकीस आणल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
 
मॅनहोलजमध्ये सापडल्या बनावट पावत्या
- याबाबत सविस्तर माहिती अशी की कोल्हापूर येथील ऑनलाइन दिव्य मराठीचे प्रतिनिधी येथील वाहतूक नियंत्रण शाखेत वार्तांकनाच्या कामानिमित्त गेले  होते. तेथून परत येत असताना काही पोलिस आपल्याकडील बनावट पावत्या चुरगळुन दातांनी त्या चावताना त्यांना दिसले.
- हा विचित्र प्रकार पाहून काही तरी गौडबंगाल असल्याची शंका आल्याने त्या पोलिसांचा पाठलाग केला. त्यावेळी चक्क वाहतूक नियंत्रण शाखेच्या चौकीजवळच असणाऱ्या ड्रेनेज लाईनच्या चेंबर मध्ये चुरगळलेल्या पावत्या टाकून पोलिस कर्मचारी पुढे निघून गेले. 
- दिव्य मराठीच्या प्रतिनिधींनी याची माहिती स्थानिक नेत्यांना दिली. तसेच कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना बोलावून चेंबरचे झाकण उचलून पाहिले. तेव्हा अशा बनावट पावत्यांचा ढीग त्या ठिकाणी आढळून आला. 
- याचा जाब शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांना विचारला. त्यावर हा प्रकार चुकीचा असून या प्रकरणी संबंधित पोलिसांची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल असे उत्तर त्यांनी दिले.
 
वाहनधारकांची खुली लूट
कोल्हापूर शहरात चार भाडेतत्त्वावर घेण्यात आलेल्या चार  क्रेन दररोज नो पार्किंग मधील वाहने उचलण्याची कारवाई करतात. यावर कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांचे नित्यनियमाने वरकमाई चे धोरण ठरलेले आहे. कोल्हापूर शहरात येणाऱ्या पर्यटकांना अक्षरशः लुटण्याचे काम शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस करतात. कारवाई करण्यात आलेल्या कोणत्याही वाहनधारकाला सरकारी पावती न देता बनावट पावत्या देऊन पैसे उकळण्याचे धंदे करून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मर्जीने राजरोस भ्रष्टाचार सुरू असल्याचे यातून समोर आले आहे.
 
स्थानिक नेते संतप्त
चक्क चौकीजवळच असणाऱ्या ड्रेनेजच्या मॅनहोलमध्ये वाहनधारकांवर करण्यात येणाऱ्या दंडाच्या बनावट पावत्यांचा ढीग सापडल्याने वाहतुक पोलिसांची चोरी आणि सरकारी पैशावर मारला जाणारा डल्ला उघडकीस आला आहे. हा प्रकार तात्काळ बंद करून भाडेतत्त्वावर घेण्यात आलेल्या क्रेन बंद कराव्यात आणि पोलिस खात्याने स्वतःच्या क्रेन विकत घ्याव्यात अन्यथा एकही वाहतूक शाखेची एकही  क्रेन कोल्हापूर शहरात फिरू देणार नाही असा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी दिला आहे.
 
पुढील स्‍लाइडवर पाहा, व्हिडिओ... 
 
 
बातम्या आणखी आहेत...