आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापूर, हातकणंगलेत राज्यात सर्वाधिक मतदान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर - कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघांत राज्यात सर्वाधिक अनुक्रमे 68 व 69 टक्के मतदान झाले. मतदानाचा हा वाढलेला टक्का कुणाला धक्का देणार याचीही चर्चा आता सुरू झाली आहे. खासदार राजू शेट्टी यांच्या हातकणंगले मतदारसंघातील सोनुर्ले गावच्या 1109 मतदारांनी मूलभूत सुविधांसाठी मतदानावर बहिष्कार घातला होता.

कोल्हापुरात खासदार सदाशिवराव मंडलिक यांचे चिरंजीव संजय मंडलिक विरुद्ध धनंजय महाडिक यांच्यातील लढत लक्षवेधी बनली आहे. महाडिक यांच्यासाठी कामगार मंत्री हसन मुश्रीफ आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून मंडलिक यांच्यासाठी महायुतीने जिवाचे रान केले आहे. दुसरीकडे हातकणंगले मतदारसंघात खासदार राजू शेट्टी आणि काँग्रेसचे कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्यातील लढत लक्षवेधी ठरली . शेट्टी यांच्या शिरोळ तालुक्यात तर अतिशय उत्साहाने मतदार केंद्रांवर मतदार रांगेत उभे राहिल्याचे चित्र दिसून येत होते.

सोनुर्ले गावचा बहिष्कार
राजू शेट्टी यांच्या मतदारसंघातील शाहूवाडी तालुक्यातील सोनुर्ले गावच्या 1109 मतदारांनी मतदानावर बहिष्कार घातला आहे. रस्त्याचे अपूर्ण आणि दर्जाहीन काम आणि अन्य मूलभूत सुविधांचा अभाव यामुळे हा बहिष्कार घातल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.