आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लष्करात नोकरीचे आमिष; 58 लाखांची फसवणूक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे/कोल्हापूर - लष्करात सुभेदार पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एका भामट्याने 21 लोकांची 58 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संदीप बळवंत गुरव (रा. कोल्हापूर) या माजी सैनिकाविरोधात खडकी पोलिस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला कोल्हापुरातून अटक करण्यात आली आहे.

हर्षवर्धन श्रीकांत भोसले (वय 21, रा.कवठेमहाकाळ) यांनी फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार संदीप गुरव याने भोसले व इतर 20 लोकांना लष्करात नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. त्याकरिता नोव्हेंबर 2013 पासून आतापर्यंत त्याने सर्वांचे मिळून 58 लाख 50 हजार रुपये घेतले. त्यांना बनावट सिलेक्शन लेटर देऊन नोकरी न लावता फसवणूक केली केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक एस. पाटील पुढील तपास करत आहे.

(फोटो - संदीप गुरव )