आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापुरात शेजारणीने डूप्लीकेट चावी बनवून केली दागिन्यांची चोरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोलिसांनी जप्त केलेले दागिने. - Divya Marathi
पोलिसांनी जप्त केलेले दागिने.
कोल्हापूर- लक्ष्मीपुरी येथे 4 दिवसांपुर्वी शेजारणीकडून झालेली घरफोडी लक्ष्मीपुरी पोलिसांनी आज उघडकीस आली. याप्रकरणी संशयित महिलेला अटक करण्‍यात आली आहे. तिच्याकडून 9 तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्‍यात आले आहेत. आसमा शाहरूख मुल्ला (वय 22, लक्षतीर्थ वसाहत) असे अटक केलेल्‍या महिलेचे नाव आहे.
 
याबाबत लक्ष्मीपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इब्राहिम हुसेन शेख( रा.घर क्रमांक 629 ए वॉर्ड, साई गल्ली, लक्षतीर्थ वसाहत, कोल्हापूर) यांनी त्यांच्या राहत्या घरातून 9 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरी झाल्याची फिर्याद 9 सप्टेबर रोजी दाखल केली होती. त्यावेळी त्यांनी शेजारी राहणाऱ्या आसमा मुल्ला हिच्यावर संशय व्यक्त केला होता.आसमा मुल्ला हिने काही दिवसापूर्वी आपल्या घरातील कुलूप नादुरुस्त झाले आहे, असे सांगून इब्राहिम शेख यांच्या पत्नीकडून त्यांच्या घरातील कुलूप-चावी नेली होती. त्या कुलुपाची डूप्लीकेट चावी बनवून आपल्याकडे ठेवली होती. त्यामुळे लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी आपल्या डी.बी.पथकाला आसमा मुल्ला हिच्यावर नजर ठेवण्यास सांगितले. तिच्या संशयास्पद हालचालीवरून तिला ताब्यात घेवून पोलिसी खाक्या दाखवताच तिने ही चोरी केल्याची कबुली दिली. चोरलेले दागिने परत केले.जवळपास 1 लाख 80 हजार रुपये किमतीचे हे दागिने हस्तगत करून अवघ्या 5 दिवसात ही चोरी उघडकीस आणल्याने डीबी पथकाचे कौतुक केले.
 
हा गुन्हा उघडकीस आणण्यात सहायक पोलिस निरीक्षक संगीता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दादासाहेब पवार,अजीज शेख, पोलीस नाईक नामदेव पाटील, अभिजीत घाटगे, तानाजी गुरव, विनायक फराकटे, अजय वाडकर,अभिजीत व्हरांबळे, विजय देसाई, प्रशांत पाथरे, सुभाष चौगले यांनी सहभाग घेतला.
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...