आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इचलकरंजीत गोदामाला आग, दहा कोटींचे नुकसान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - इचलकरंजी येथील प्रसिद्ध भिकुलाल दगडूलाल मर्दा यांच्या कापड गोदाम व कार्यालयाला शुक्रवारी पहाटे आग लागून दहा कोटींचे नुकसान झाल्याची घटना घडली. घटनेनंतर अग्निशमन दलाच्या दहा गाड्यांनी आग आटोक्यात आणली. वखारभार परिसरातील मर्दा यांचा हा शहरातील जुना उद्योग असून या ठिकाणी पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर प्रक्रिया केलेल्या कापडाची साठवणूक करण्यात आली होती. तयार कापडाचे पॅकिंगही येथे करण्यात येते. शुक्रवारी पहाटे धुराचे लोट दिसू लागल्याने नागरिकांनी मर्दा यांना याबाबत माहिती दिली. मात्र, आत कापडाचे गठ्ठेच्या गठ्ठे असल्याने काहीही केले तरी आग आटोक्यात आली नाही. अखेर जेसीबीने भिंती पाडून काही गठ्ठे बाहेर काढण्यात आले.