आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारागृहात पार्टी झाल्याचे पुरावे नाहीत, पण कर्तव्यात कसूरचा ठपका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - शहरातील कळंबा कारागृहामध्ये पार्टी झाल्याचे कोणतेही पुरावे नाहीत, परंतु कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कारागृह अधीक्षकासह दोन अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून तीन हवालदारांना निलंबित करण्यात आले आहे. तुरुंग उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी बुधवारी ही माहिती दिली. दोनच दिवसांपूर्वी कळंबा कारागृहात गांजा, मटण दारू पार्टी झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. जामिनावर सुटलेल्या एका कैद्याने हे चित्रीकरण केले होते. हा प्रकार उघड झाल्यानंतर साठे यांनी दोन दिवस कोल्हापुरात चौकशी केली.

त्या म्हणाल्या, ‘दारू, गांजा, मटण यापैकी आम्हाला काहीही सापडले नाही. मात्र, त्यांनी सकाळी दिलेला शिरा पुन्हा गरम करून खाण्यासाठी कागद आणून जाळ करून त्यावर हंडी ठेवली होती. तसेच याचे चित्रीकरण झाले याचा अर्थ मोबाइल तुरुंगात आला ही गंभीर बाब आहे. याचा विचार करून तुरुंग अधीक्षक सुधीर किंगरे यांची बदली केली असून त्यांचा पदभार शरद शेळके यांच्याकडे देण्यात आला आहे. तसेच जाधव, कांबळे, टिपुगडे या तीन हवालदारांचे निलंबन केले आहे.
त्यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याबद्दल ठपका ठेवण्यात आला आहे. अन्य दोघांवर कारवाई करण्याचा अहवाल तुरूंग प्रशासनाकडे पाठवण्यात आला आहे. तसेच जेलर उत्तरेश्वर गायकवाड यांची सांगलीला बदली करण्यात आली आहे असे साठे यांनी सांगितले.