आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापूर: करवीर निवासिनी अंबाबाईच्या मुर्तीची पुन्हा झीज; 2 वर्षांपूर्वीच केले रासायनिक संवर्धन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर: करवीर निवासिनी अंबाबाईच्या मूर्तीची आता पुन्हा झीज सुरु असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अवघ्या २ वर्षापूर्वी देवीच्या मूर्तीवर केलेली रासायनिक संवर्धन प्रक्रिया कुचकामी ठरली की काय असा सवाल अंबाबाईच्या भक्तांकडून विचारला जात आहे.
 
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील देवीची मूर्ती तब्बल २ हजार वर्षे पुरातन असल्याची आख्यायिका आहे. या मूर्तीची झीज होत असल्याचे समोर आली आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी पुरातत्व खाते आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्यावतीने २०१५ साली मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर पुढच्या १०० वर्षांत देवीच्या मूर्तीला काही होणार नाही असा दावाही पुरातत्व विभागाने केला होता. मात्र रासायनिक संवर्धन प्रक्रिया करून आता कुठे दीड-पावणेदोन वर्षे होतात न होतात तोपर्यंत या मूर्तीवर पांढरे डाग दिसू लागले आहेत. तसेच पुरातत्व विभागाच्या वतीने मूर्तीवर लावण्यात आलेला रासायनिक लेप सुद्धा निघत आहे.
 
देवीच्या मूर्तीच्या पायाचा भाग आणि गदेचे टोकही झिजल्याचे समोर आले आहे.त्यामुळे रासायनिक संवर्धन प्रक्रियेबद्दल आता उलट-सुलट चर्चा सुरु झाली आहे. देवीच्या मंदिराच्या गाभाऱ्यातील आद्रता कमी करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती सांगत असली तरी दिवसेंदिवस भक्तांची वाढती गर्दी आणि गाभाऱ्यातील तापमानामुळे मूर्तीची झीज होत आहे. अशी चर्चा जाणकार करत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी तात्पुरते अध्यक्ष असलेली पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती यावर काय निर्णय घेणार याकडे देवीच्या भक्तांचे लक्ष लागले आहे. 
 
मूर्तीची होणारी झीज थांबवण्यासाठी गाभाऱ्यातील तापमान कमी करण्यासाठी देवीच्या पूजेसाठी आणले जाणारे निर्माल्य आणि फुलांचा वापर टाळला पाहिजे, पुजेसाठी गायीच्याच दुधाचा वापर केला पाहिजेत, देवीच्या दागिन्यांची संख्या कमी केली पाहिजेत,आर्द्रता कमी करण्यासाठी गर्भकुडीतील पाण्याचा साठा कमी केला पाहिजेत. अशा काही अटी रासायनिक पुरातत्व विभागाने रासायनिक संवर्धन प्रक्रियेनंतर घातल्या होत्या. मात्र श्रीपुजकानी वारंवार मागणी करूनही मंदिराच्या गाभाऱ्यातील आर्द्रता कमी करण्यासाठीचे प्रयत्न देवस्थान समितीच्यावतीने केले जात नसल्याचा आरोप श्रीपुजक गजानन मुनीश्वर यांनी केला आहे. 
 
दरम्यान सोमवारी जिल्हाधिकारी आणि रासायनिक रासायनिक संवर्धन प्रक्रियेवेळी असणारे पुरातत्व विभागाचे अधिकारी देवी अंबाबाईच्या मूर्तीची पाहणी करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
बातम्या आणखी आहेत...