आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महालक्ष्मीच्या मूर्तीसंवर्धनात तज्ज्ञांचा खाेडा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- श्री महालक्ष्मीच्या रासायनिक संवर्धन प्रक्रियेच्या निमित्ताने विविध धार्मिक विधींना अतिशय उत्साही वातावरणामध्ये बुधवारी प्रारंभ झाला. मात्र, ही प्रक्रिया करण्यासाठी औरंगाबाद येथून येणाऱ्या तज्ज्ञांनी कोल्हापूरला येण्यास असमर्थता दर्शवल्याचे संध्याकाळी कळताच संभ्रम निर्माण झाला अाहे.

सकाळी आठ वाजता श्रीपूजकांनी महासंकल्प केला. खातेदार श्रीपूजक शेखर मुनीश्वर हे सपत्निक पुण्याहवाचनास बसले. अभिषेकानंतर मुख्य यज्ञमंडपामध्ये विविध विधींना प्रारंभ करण्यात आला. साडेदहा वाजता करवीर संस्थानचे छत्रपती श्रीमंत शाहू महाराज यांनी मूर्तीवर अभिषेक केला. त्यांनी अर्पण केलेले महावस्त्र या वेळी नेसवण्यात आला. नंतर आरती करण्यात आली.

या वेळी सुहास जोशी, संजीव मुनीश्वर, अजित ठाणेकर, केदार मुनीश्वर यांनी या विधींची माहिती महाराजांना दिली. आजच्या या विधीवेळी धारवाडचे पं. राजेश्वरशास्त्री जोशी, औदुंबरचे पं. वेंकटरमणशास्त्री दीक्षित आपल्या शिष्यांसह उपस्थित होते.
अाैरंगाबादेतील तज्ज्ञांच्या भूमिकेबाबत संभ्रम
गेली २० वर्षे मूर्तीच्या संवर्धनाबाबत लढा सुरू होता. वज्रलेप मूर्तीला पेलवणारे नसल्याचे न्यायालयाने मान्य करत रासायनिक संवर्धनाला परवानगी दिली. संवर्धनाचा खर्च देवस्थानने व धार्मिक विधी श्रीपूजकांच्या खर्चाने करायचे. यासाठी देणगी गोळा करायची नाही, असे आदेश न्यायालयाने दिले. मात्र, ही मूर्ती भंग पावल्याचा दावा करत ती बदलण्याची मागणी हिंदू जनजागृती समितीने केली. अशा मतभिन्नतेमुळेच पुरातत्त्वच्या अधिकाऱ्यांनी असमर्थता दर्शवल्याचे सांगण्यात आले.