आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापुरात महालक्ष्मी मंदिरातील दागिन्यांची पुन्हा सुरू होणार मोजणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर- शहरातील प्रसिद्ध श्री महालक्ष्मी मंदिरातील खंडित झालेली दागिन्यांची मोजदाद पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. येत्या आठवड्याभरात ही प्रक्रिया पुन्हा सुरू होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. तत्कालिन जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी घेतलेल्या निर्णयानुसार जून 2012 मध्ये महालक्ष्मीच्या दागिन्यांची मोजदार सुरू करण्यात आली. यासाठी मुंबई येथील एका सराफाने मोफत मोजणी करून देण्याची तयारी दर्शविली होती. परंतु नंतर त्यांच्या वैयक्तिक अडचणी निर्माण झाल्यामुळे त्यांनी हे काम थांबवले. दरम्यानच्या काळात कोल्हापुरातील सराफा संघटनेनेही या प्रक्रियेला आक्षेप घेतला होता.