आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ढगाळ हवामानामुळे महालक्ष्मी किरणोत्सव नाही; भाविकांची निराशा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर- येथील महालक्ष्मी मंदिरात 31 जानेवारी रोजी होणारा किरणोत्सव ढगाळ वातावरणामुळे होऊ शकला नाही. त्यामुळे भाविकांची निराशा झाली. या मंदिरामध्ये 9, 10, 11 नोव्हेंबर आणि 31 जानेवारी, 1 व 2 फेब्रुवारीला किरणोत्सव होतो. मावळतीची सूर्यकिरणे मंदिरातून गाभार्‍यात येतात व देवीला किरणांचा अभिषेक होतो. गुरूवारी हा सोहळा अनुभवण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. परंतु सुमारे दोन तास ढगाळ वातावरण राहिल्याने किरणोत्सव झाला नाही.