आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: कोल्हापूरच्या मराठा मोर्चात \'खास हेअरस्टाईल\'ने वेधले सगळ्याचे लक्ष

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्पर्शाने पावन झालेल्या तसेच राजर्षी शाहू महाराजांच्या आदर्श समाजकार्याचा वारसा लाभलेल्या कोल्हापुरात मराठा क्रांती मूकमोर्चामध्ये शनिवारी लाखोंचा जनसागर उसळला. कोल्हापूरात निघालेल्या मूकमोर्चाने गर्दीचे विक्रम मोडीत काढल्याचा दावा संयोजकांनी केला. महत्त्वाचे म्हणजे मोर्चात सहभागी झालेल्या मराठा बांधवांनी केलेल्या खास हेअरस्टाईलची सर्वत्र चर्चा आहे.

कराडमधल्या दिलबहार सलूनसमोर मोर्चात सहभागी होणार्‍या मराठा समर्थकांच्या रांगा लागल्या होती. ही रांग होती खास हेअरस्टाईल करण्यासाठीची. 'एक मराठा लाख मराठा…' हे घोषवाक्य असो… किंवा 'मराठा समाजाचं प्रतीक असलेला भगवा झेंडा…' किंवा चक्क 'शिवराय'ही अशा कलाकुसरी हेअरस्टाइलमधून उमटवण्यात आल्या होत्या.

कराडच्या दिलबहार सलूनमध्ये मराठा मोर्चांची डिझाईन्स कोरण्याचे काम अगदी लीलया सुरु होते. विशेष म्हणजे ही सारी कलाकुसर कृष्णा काशिद यांनी अगदी मोफत करून दिली.

पुढील स्लाइडवर पाहा, कोल्हापूरच्या मोर्चासाठी तयार करण्यात आलेल्या काही खास हेअरस्टाईल....
बातम्या आणखी आहेत...